Tarun Bharat

युनोने अंमली पदार्थांच्या सूचीतून हटविले

Advertisements

वृत्तसंस्था/  संयुक्त राष्ट्र

संयुक्त राष्ट्रसंघातील ऐतिहासिक मतदानानंतर गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने नुकताच हा निर्णय घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्रसंघाने गांजाला

धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवले आहे. यासाठी झालेल्या मतदानात गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यासाठी 27 देशांनी समर्थन दिले तर याविरोधात उर्वरित देशांनी मतदान केले. भारतानेही गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्याच्या समर्थनार्थ मतदान केले. तर, चीन, पाकिस्तान आणि रशिया यांसारख्या 25 देशांनी विरोधात मतदान केले. गांजाचे तोटे आणि त्याच्या वैद्यकीय फायद्यांबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा सुरू आहे. सध्या गांजाचे वैद्यकीय महत्त्व 50 पेक्षा जास्त देशांनी समजून घेत गांजाला वैध ठरवले आहे. वैद्यकीय कारणासाठी कॅनडा, उरुग्वे आणि अमेरिकेच्या 15 राज्यांमध्ये गांजाला परवानगी देण्यात आली आहे. गांजा किंवा भांगपासून बनलेल्या औषधांचा वापर संयुक्त राष्ट्रसंघाच्या या निर्णयानंतर वाढू शकतो. याशिवाय गांजाच्या वैज्ञानिक संशोधनासाठीही गती मिळू शकते. अनेक देश या निर्णयानंतर गांजा किंवा भांगेच्या वापराबाबतच्या आपल्या धोरणामध्ये बदल करण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचा हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे मत व्यक्त होत आहे.  

Related Stories

नेपाळमधील मध्यावधी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर

Patil_p

120 वर्षांपर्यंत जगू शकणार माणूस

Patil_p

सापांसाठी प्रसिद्ध बेट

Patil_p

तप्त वाळवंटात चटपटीत पदार्थाची निर्मिती मास्टरशेफची किमया

Amit Kulkarni

13 वर्षीय मुलीकडून अद्भूत शोध

Patil_p

नेपाळ नरमला, भारतीय वृत्तवाहिन्यांवरील बंदी हटविली

Patil_p
error: Content is protected !!