- आता गुरुवारी सकाळी 7 वाजेपर्यंत निर्बंध कायम
ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात वाढत चाललेली कोरोनाची रुग्ण संख्या आणि हायकोर्टाद्वारे अनेक वेळा संपूर्ण प्रदेशात लॉकडाऊन करण्याचे आदेश मिळाल्यानंतर युपी सरकारने सोमवारी आणखी दोन दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 6 मे पर्यंत म्हणजेच गुरुवारी सकाळी 7 वाजेपर्यंत निर्बंध कायम असणार आहेत.


यापूर्वी शुक्रवारी सायंकाळी 8 वाजल्यापासून मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. तो आता आणखी दोन दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. हे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीम 9 सह सुरू असलेल्या बैठकीत दिले आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी इलाहाबाद हायकोर्टाने प्रदेशातील कोरोना स्थितीवर सूनवाई करताना म्हटले होते की, दोन दिवसांचे लॉकडाऊन पुरेसे नाही आहे. सरकारने कोरोनाची चेन तोडण्यासाठी दोन दिवसांचे लॉकडाऊन लावले. यासोबत अन्य निर्बंध ही लादले आहेत. पण सद्य परिस्थिती पाहता हे उपाय अपुरे वाटत आहेत. यावेळी हायकोर्टाने जास्त काळासाठी लॉकडाऊन लावण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.