Tarun Bharat

युरी आलेमाव यांचा गोवा फॉरवर्डला रामराम

Advertisements

प्रतिनिधी/ मडगाव

कुंकळळी मतदारसंघातील युवा नेते युरी आलेमाव यांनी काल गुरूवारी गोवा फॉरवर्ड पक्षाचा राजीनामा दिला असून राजीनाम्याचे पत्र गोवा फॉरवर्ड पक्षाच्या अध्यक्षांना सादर केले आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतानाच, पक्षाने दिलेल्या इतर जबाबदाऱया आपण वैयक्तीक कारणास्तव पूर्ण करू शकत नसल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

गोवा फॉरवर्ड पक्षाने आपल्याला दिलेला पाठिंबा व मार्गदर्शनाबद्दल त्यांनी पक्षाचे आभार देखील मानले आहेत. युरी आलेमाव हे लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असून कुंकळळी मतदारसंघातून ते काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

दरम्यान, युरी आलेमाव यांनी राजीनामा देताच, गोवा फॉरवर्डने देखील कुंकळळी मतदारसंघातील आपले गट मंडळ बरखास्त केले असून लवकरच नवीन गट मंडळ नियुक्त केले जाणार असल्याचे म्हटले आहे.

समर्थकांच्या इच्छेनुसार राजीनामा

कुंकळळी मतदारसंघात आपण जेव्हा जिल्हा पंचायत सदस्याच्या प्रचारात फिरत होतो. त्यावेळी येथील आपल्या समर्थकांकडून गोवा फॉरवर्ड पक्ष सोडावा व काँग्रेस मध्ये प्रवेश करावा अशा प्रतिक्रीया व्यक्त झाल्या होत्या. त्यानुसार आपण समर्थकांच्या इच्छेनुसार राजीनामा दिल्याचे युरी आलेमाव यांनी दै. तरूण भारतपाशी बोलताना स्पष्ट केले आहे.

कुंकळळी मतदारसंघातील जनता आपल्यासाठी श्रेष्ठ असून त्यांच्या इच्छेनुसारच आपण पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण, लोकांच्या भावनाचा आदर करणार असून त्यांच्या पाठिंब्यावरच पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Related Stories

साखळीत बुधवारी आढळले 17 कोरोना रूग्ण.

Omkar B

घराघरातच आज घुमणार लईराईचा जयघोष

Omkar B

सौ.विजयाताईवर आज अंत्यसंस्कार

Patil_p

दिपनगर कुर्टी येथे उघडय़ावर सांडपाणी सोडण्य़ाचे प्रकार

Amit Kulkarni

‘आप’च्या आमदार आतिशी गोव्यात दाखल

Omkar B

आदिवासी धनगर समाज अजूनही न्यायापासून वंचित

Amit Kulkarni
error: Content is protected !!