Tarun Bharat

युरोपमधील तीन संघ निश्चित

यू-17 महिला विश्वचषकासाठी स्पेन, जर्मनी, इंग्लंडची निवड

वृत्तसंस्था/ मुंबई

विद्यमान विजेते स्पेन तसेच इंग्लंड व जर्मनी यांचे पुढील वर्षी भारतात होणाऱया महिलांच्या यू-17 विश्वचषक स्पर्धेसाठी नाव निश्चित करण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे युरोपियन पात्रता स्पर्धा रद्द करण्यात आल्यानंतर शुक्रवारी ही घोषणा करण्यात आली.

‘इंग्लंड, जर्मनी व स्पेन हे संघ पुढील वर्षी भारतात होणाऱया यू-17 महिला विश्वचषक स्पर्धेत युरोपचे प्रतिनिधित्व करतील, असे युरोपियन फुटबॉलवर नियंत्रण ठेवणाऱया युफाने सांगितले आहे,’ असे या स्पर्धेच्या स्थानिक संयोजन समितीने निवेदनाद्वारे सांगितले. युफा यू-17 महिला चॅम्पियनशिप स्पर्धा कोरोना महामारीमुळे रद्द केल्यानंतर मानांकनाच्या आधारावर या तीन संघांची निवड करण्यात आली असल्याचेही या निवेदनात सांगण्यात आले आहे. आता या स्पर्धेत स्पेन, इंग्लंड, जर्मनी व यजमान भारतासह उत्तर कोरिया, जपान, न्यूझीलंड हे याआधीच पात्र ठरलेले संघही सहभागी होणार आहेत. 2018 मध्ये उरुग्वेत झालेल्या स्पर्धेत स्पेनने मेक्सिकोचा 2-1 असा पराभव करून जेतेपद मिळविले होते. पुढील वर्षी भारतातील स्पर्धा 17 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत होणार आहे.

Related Stories

सेहवाग के सिर पर जितने बाल नही, उतना मेरे पास माल है!

Patil_p

कोलंबो स्टार्सचा 58 धावांनी विजय

Patil_p

नीरज चोप्रा आज मायदेशी परतणार

tarunbharat

इराणी करंडक क्रिकेट सामना 1 ऑक्टोबरपासून

Patil_p

आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा लांबणीवर

Patil_p

भारताचा मालदीववर एकतर्फी विजय

Patil_p