Tarun Bharat

युरोपमध्ये होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी प्रा. दिनेश गुंड यांची पंच म्हणून निवड

17ते 25 जुलै अखेर हंगेरी येथे होणार स्पर्धा

वार्ताहर / औंध

जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने हंगेरी (युरोप) येथे होणाऱ्या जागतिक कँडेट कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती महासंघाने आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. दिनेश गुंड यांची निवड केली आहे. ही स्पर्धा 17ते 25 जुलै अखेर होणार आहे.

प्रा. गुंड हे जागतिक कुस्ती संघटनेचे प्रथम श्रेणीचे पंच आहेत. आतापर्यंत त्यांनी जागतिक कुस्ती स्पर्धा, आशियाई स्पर्धा, आँलम्पिक पात्रता स्पर्धा अशा 40 हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले आहे. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथील आहेत.

त्यांच्या निवडीबद्दल कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, संपत साळुंखे, ललित लांडगे कार्यकारणीचे सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

प्रांताधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी

datta jadhav

सातारचा घरगुती बनवलेला फराळ पोहचला ऑस्ट्रेलिया, जर्मनीला

Patil_p

ग्रामीण साखळया तोडण्याचे आव्हान, शहरं घाबरलेली

Archana Banage

युगांडाचा ऑलिंपिक संघ क्वारंटाईनमध्ये

Patil_p

जोस्ना चिनाप्पा उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

Patil_p

राष्ट्रीय रेसिंग स्पर्धेत विष्णू प्रसादची चमक

Patil_p