Tarun Bharat

युरोपात झाला महाराष्ट्राचा गौरव!

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

हवामान बदलावर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्राने केलेल्या अथक प्रयत्नांची दखल COP26 या जागतिक व्यासपीठाने घेत महाराष्ट्राला ‘प्रादेशिक नेतृत्त्व पुरस्कारा’ने गौरविले आहे. स्कॉटलंड येथे COP26 परिषदेत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

आदित्य ठाकरेंनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राला प्रादेशिक नेतृत्त्वासाठी पुरस्कार मिळाला. आपल्या Climate Partnerships & Creative Climate Solutions ची येथे विशेष दखल घेतली. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो.

हा पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे. उपराष्ट्रीय स्तरावर हवामान वाचवण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांना अंडर 2 कोलिशनने मान्यता दिली. जी झपाटयाने वाढणाऱया हवामान बदलांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शाश्वत प्रयत्न करते.

Related Stories

निकाली कुस्ती मैदानामध्ये अनिरुद्ध पाटीलचा रणवीर पाटील यास धोबीपछाड

Archana Banage

हरियाणामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 4854 वर

Tousif Mujawar

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या दीड लाखांवर

datta jadhav

चित्रपटगृहे आठवडाभर बंदच

Patil_p

बसस्थानकात बसखाली वृद्धा चेंगरली

Patil_p

ममता बॅनर्जींचा मोठा विजय

Archana Banage