Tarun Bharat

युरोपियन ऍथलेटिक्स स्पर्धा रद्द

वृत्तसंस्था/ पॅरिस

कोरोना व्हायरस महामारीमुळे येत्या ऑगस्टअखेरीस पॅरिसमध्ये होणारी 2020 ची युरोपियन ऍथलेटिक्स स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी गुरुवारी जाहीर केला.

कोरोना महामारीमुळे जागतिक स्तरावरील सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. अलीकडच्या कालावधीत युरोपियन ऍथलेटिक्स स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ऑलिम्पिक स्पर्धा तसेच युरोपियन चषक फुटबॉल स्पर्धाही एक वर्षासाठी लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. पॅरिसमधील युरोपियन ऍथलेटिक्स स्पर्धा 25 ते 30 ऑगस्ट दरम्यान खेळविली जाणार होती. आता या स्पर्धेची नवी तारीख काही दिवसांनंतर जाहीर केली जाईल. सायकलिंग टूर डी फ्रान्स स्पर्धाही दोन महिन्यांच्या कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे.

Related Stories

एकाच दिवसात भारताला 2 सुवर्णपदके

Patil_p

बंगाल, तामिळनाडूची विजयी सलामी

Patil_p

फ्रान्सचा फुटबॉलपटू मेटुडी निवृत्त

Patil_p

‘यलो आर्मी’विरुद्ध विजयाच्या ट्रकवर परतण्याचे आरसीबीसमोर आव्हान

Amit Kulkarni

उबेर चषक स्पर्धेत भारताचा स्पेनवर विजय

Patil_p

मँचेस्टर सिटीचा बर्नलीवर मोठा विजय

Patil_p