Tarun Bharat

युरो टी-20 स्लॅम पुन्हा एकदा लांबणीवर

वृत्तसंस्था/ लंडन

युरो टी-20 स्लॅम क्रिकेट स्पर्धा सलग दुसऱया वर्षी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चित परिस्थितीमुळे  हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे आयोजकांनी बुधवारी सांगितले.

आयर्लंड, स्कॉटलंड, नेदरलँड्स येथील सहा प्रँचायजी संघांत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. 2019 मध्येच त्याची सुरुवात होणार होती. पण सुरू होण्याच्या तारखेआधीच ती लांबणीवर टाकण्यात आली होती. या स्पर्धेत अनेक देशांतील टी-20 स्टार खेळाडूंनी खेळण्याचे मान्य केले असून त्यात न्यूझीलंडचा मार्टिन ग्युप्टिल, इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन, पाकचा शाहिद आफ्रिदी यांचा समावेश आहे. यावर्षीपासून तरी स्पर्धेची सुरुवात करावी, अशी आयोजकांची मनीषा होती. पण ती शक्यता फारच कमी असल्याचे त्यांना दिसून आले. आंतरराष्ट्रीय प्रवासबंदी, क्वारंटाईनच्या सुविधा आणि प्रेक्षकांशिवाय खेळावे लागण्याची शक्यता या सर्व बाबींचा विचार करून स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याचे क्रिकेट आयर्लंडचे सीईओ वॉरेन डय़ुट्रॉम यांनी सांगितले.

Related Stories

पुण्याचा शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी

Patil_p

जोकोविचची एटीपी कपमधून माघार

Patil_p

अर्शदीप सिंग केंटशी करारबद्ध

Patil_p

संजू सॅमसनची झुंझार खेळी अखेर निष्फळ

Amit Kulkarni

आता लक्ष्य द.आफ्रिकेविरुद्ध मालिकाविजयाचे

Patil_p

लंकेचा सलामीचा सामना आज बांगलादेशविरुद्ध

Patil_p