Tarun Bharat

युवकाच्या मृत्यूप्रकरणी निर्दोष

प्रतिनिधी /मडगाव

वार्का येथे झालेल्या एका रस्ता अपघातातील एकाच्या मृत्यू प्रकरणासंबंधी मडगावच्या न्यायालयाने कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील यशवंत गोपाळ गुरव या 32 वर्षीय संशयित आरोपीला त्याच्यावरील आरोपातून निर्दोष मुक्त करण्याचा आदेश बुधवारी  दिला.

न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार अपघाताची ही घटना 8 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी  दीड वाजण्याच्या सुमाराला नवनगुली वार्का येथे घडली होती. या प्रकरणी संशयित आरोपी एमएच-09-सीएम-5772 क्रमांकाची कार निष्काळजीपणे चालवत असताना समोरुन येत असलेल्या एका दुचाकीला धडक बसली होती. या धडकेत मारुती निगप्पा कुपटगीरी (24) हा गंभीररित्या जखमी झाला होता आणि इस्पितळातळात  नेत असताना वाटेतच त्याला मृत्यू आला होता.

या अपघाताप्रकरणी कोलवा पोलिसांनी वरील संशयित आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 279 आणि 304- अ कलमाखाली गुन्हा नोंद करुन अटक केली होती व नंतर जामिनावर सोडून दिले होते.

या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरु झाला तेव्हा एकूण 6 साक्षीदारांनी न्यायालयात साक्ष दिली. साक्ष व पुरावे यावर आधारुन न्यायालयाच्या लक्षात असे आले की संशयित आरोपीच्या निष्काळजीपणामुळे मयत दगावला हे सिद्ध करणारा ठोस पुरावा सरकारपक्ष न्यायालयात सादर करु शकला नाही.

परिणामी, या प्रकरणातील संशयिताला  मडगावचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शाहीर इसानी यांच्या न्यायालयाने निर्दोष मुक्त करण्याचा आदेश काल बुधवारी दिला.

Related Stories

वेळूस देवस्थानचा सुप्रसिद्ध कालोत्सव आजपासून

Amit Kulkarni

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील कोविड वॉर्ड बंद

Amit Kulkarni

रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसुती : जुळय़ांना जन्म

Omkar B

गोमंतक मराठा समाजाच्या काणकोण शाखेतर्फे 133 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या

Amit Kulkarni

डॉ. सुरेश आमोणकरांच्या पार्थिवावर आमोणेत अंत्यसंस्कार

Patil_p

केपे गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रमेश नाईक

Amit Kulkarni
error: Content is protected !!