Tarun Bharat

युवतीच्या खूनप्रकरणाचा चार तासात पर्दाफाश

संशयित मारेकरी गजाआड; दाजीला अडकावण्यासाठी मेव्हण्याचे कृत्य

प्रतिनिधी कराड ः कार्वे (ता.कराड) येथे निर्जनस्थळी युवतीच्या डोक्यात दगड घालून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. अत्यंत गुंतागुंतीच्या या खून प्रकरणाचा छडा लावण्यात कराड पोलिसांसह सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. दाजीला खुनाच्या गुह्यात अडकाविण्यासाठी मेव्हण्याने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. वनिता आत्माराम साळुंखे (वय 30, रा. महिंद, ता. पाटण) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. तर शरद हणमंत ताटे (वय 30, रा. येरवळे, ता. कराड) असे पोलिसांनी खून प्रकरणी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

  दरम्यान संशयित ताटे याला न्यायालयासमोर हजर केले असता 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्वे परिसरात भैरवनाथ मंदिराजवळ उसाच्या शेतात सोमवारी तीस वर्षे वयाच्या युवतीचा मृतदेह आढळला होता. युवतीच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याने ओळख पटत नव्हती. पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे, भरत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच खुनाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचायांसह घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांच्या समन्वयाने तपास पूर्ण

 पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत असताना मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडली. गांजा सापडला होता. त्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. चिठ्ठीमध्ये एका व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करून त्याने मला लग्नग्न करतो म्हणून आणले. माझ्याशी संबंध ठेवले व माझ्याबरोबर लग्नग्न करत नसून मला मारहाण करून माझ्याशी संबंध ठेवले आहेत. मी जीव दिला किंवा मला काय झाले तर त्यास तो जबाबदार आहे, असा मजकूर लिहिला होता. तसेच चिठ्ठीसोबत संबंधित व्यक्तीच्या आधार कार्डची झेरॉक्स ठेवली होती. त्या चिठ्ठीच्या आधारे व आधार कार्डवरील नावावरून पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी त्यांना चिठ्ठीजवळ थोडा गांजा मिळून आला. तसेच ज्या व्यक्तीच्या नावाचे आधार कार्ड होते. त्याच्या घरातही गांजा सापडला. पोलिसांनी चौकशी पेल्यावर घरात गांजा ठेवणाराचे नाव समोर आले. यावरून येरवळेतील शरद हणमंत ताटे  याला गाठून पोलिसांनी कसून चौकशी केली. 

सुरूवातीला शरद ताटे याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली.  यातूनच वनिता साळुंखे हिचा खून शरद ताटे यानेच केला असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी संशयिताला तात्काळ अटक करून पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुह्याची कबुली दिली. 

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांनुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, साहाय्यक निरीक्षक रेखा दूधभाते, पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे, भरत पाटील, गणेश वाघ यांच्यासह शरद बेबले, साबिर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, रोहित निकम, विशाल पवार, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, धनंजय कोळी, सज्जन जगताप, उत्तम कोळी, नंदकुमार भोसले, प्रशांत एक्के, सुनंदा कांबळे, मनिषा खराडे, निलेश कदम, मिलिंद बैले, संजय काटे, अमोल पवार यांच्यासह कराड तालुका पोलीस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

वनिताचा हकनाक बळी गेला

मृत वनिता साळुंखे हिला अत्यंत निर्दयीपणे गळा आवळून संपवण्यात आले. त्यानंतर संशयित शरद ताटे याने तिच्या डोक्यात दगड घातला. वनिताचा या प्रकरणात हकनाक बळी गेला. वास्तविक वनिता साळुंखे हिची व संशयिताची फक्त तोंडओळख होती. त्यांचे अनेकदा बोलणे झाले होते. रविवारी ताटे यांने वनिताला रात्री साडेआठ वाजता कार्वे येथे निर्जनस्थळी नेले. वनिताचा गळा दाबून खून केला.

Related Stories

क्रूझ ड्रग्ज प्रकरण हा भाजपचा कट: नवाब मलिक

Archana Banage

सोलापूर : बंद पुकारणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – प्रहार’ची मागणी

Archana Banage

मराठा आरक्षणासाठी कोडोलीत शांततेच्या मार्गाने रास्ता रोको : दलित महासंघाचा पाठिंबा

Archana Banage

जिल्हय़ात वर्षात बांधली 2901 वैयक्तिक शौचालये

Patil_p

भारतात २०१९ साली १७७५ जणांनी सोडले पोलीस कोठडीतच प्राण

Archana Banage

जिल्हय़ात दोन ठिकाणी 5 लाखाची अवैध दारु जप्त

Patil_p