Tarun Bharat

युवराज सिंगची दिलगिरी

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने इन्स्टाग्राम चाटवर यजुवेंद्र चहलबाबत जातीवाचक आक्षेपार्ह टिपणी केल्याबद्दल शुक्रवारी दिलगिरी व्यक्त केली. अजाणतेपणाने माझ्याकडून मने दुखावली गेली. याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे युवराज म्हणाला. यापूर्वी युवराज सिंग व रोहित शर्मा यांनी इन्स्टाग्रामवर लाईव्ह चाट केला, त्यात युवीने चहलबद्दल टिपणी केली होती. याप्रकरणी हिसारमधील वकिलाने पोलिसात तक्रार दाखल केली. युवराजने त्यानंतर लगोलग ट्वीटच्या माध्यमातून क्षमायाचना केली. मी कोणत्याही प्रकारचा भेद मानत नाही. जातभेद, वंशभेद, लिंगभेद यांना माझ्याकडे थारा नाही. प्रत्येकाचा आत्मसन्मान जपण्याचा माझा प्रयत्न असतो, असे युवराजने ट्वीट केले.र्ं

Related Stories

न्यूझीलंडचा अष्टपैलू ग्रॅण्डहोमला दुखापत

Patil_p

वनडे मालिकेसाठी डु प्लेसिसला विश्रांती

Patil_p

ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत ब गटात

Patil_p

बुद्धिबळ ऑलिम्पियाड क्रीडाज्योत तिरुअनंतपूरममध्ये दाखल

Patil_p

माजी कर्णधार अहमदझाई अफगाण क्रिकेट संचालकपदी

Patil_p

संतोष करंडक फुटबॉल पंजाबचा पहिला विजय

Amit Kulkarni
error: Content is protected !!