Tarun Bharat

युवा अभियंते बनले.. पोलीस अधिकारी

गोवा पोलिसांच्या 2019 उपनिरीक्षक बॅचचे 20 पैकी 9 अभियंते

प्रतिनिधी/ फोंडा

देशभरातील बहुतेक युवकांचे स्वप्न आजही एक इंजिनिअर होऊन गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणे हेच आहे. पालकही त्यासाठी उदारता दाखवताना आयआयटी अभियंत्याच्या प्रवेश परीक्षेसाठी लाखो रूपये खर्चुन कोचिंग क्लासेस पाल्यांना देण्यात प्राधान्य देत असतात. मात्र भविष्यात हेच उच्चशिक्षीत अभियंत्रिकीच्या क्षेत्र सोडून   वेगळी वाट धरताना नागरी सेवेत जाण्याचा कल मागील काही वर्षापासून वाढलेला दिसून येत आहे. आज गोव्यातही हीच पद्धत रूढ होऊ लागली आहे. गोवा पोलीस दलात 2019 च्या उपनिरीक्षकांच्या 20 जणांच्याबॅचमध्ये तब्बल 9 पदवीधर अभियंत्याने पोलीस सेवेला प्राधान्य दिलेले आहे. 

भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आज 15 सप्टें. रोजी ‘इंजिनिअर्स डे’ म्हणजे ‘अभियंता दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. पोलीस दलात नोकरी मिळावी म्हणून कॉन्स्टेबलच्या पदासाठी आज इंजिनिअर्स, वकिल, पोस्ट ग्रेज्युएटच्या रांगा लागताना दिसतात. त्यात उपनिरीक्षक पदाची सुवर्णसंधी चालून आल्यास कोण सोडणार अशी प्रतिक्रिया युवा अभियंत्यांनी आजच्या दिवशी व्यक्त केली आहे. जीडीपी घसरणीच्या काळात रोजगारांच्या संधी अंधुक बनल्या असून मिळेल ते सरकारी नोकरी खिशात पाडून घ्यावी असा दृष्टीकोन प्रत्येक युवाइं&नी धरलेला आहे.

महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथून प्रशिक्षण प्राप्त

गोवा पोलिसांच्या 2019 च्या उपनिरीक्षक भरती तुकडीमध्ये विराज धावरसकर, जयदीप आम्रे, विश्वजीत ढवळीकर, विकेश हडफडकर, नारायण पिंगे, बाबलो परब, स्वदेश देसाई, संकेत तळकर, योगेश गावकर, अजित वेळीप, नितेश काणकोणकर, विभीनव शिरोडकर, विराज कोरगांवकर, प्रवीण सिमेपुरूषकर, मयुर सावंत, संकेत पोकरे, दिनदयाळनाथ रेडकर, सुनिल पाटील, मंदार परब, सर्वेश बंडन या वीसजणांच्या समावेश असून बॅचमधील नऊजण अभियांत्रिक पदवीधर आहेत. या सर्वांनी महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे प्रशिक्षण पुर्ण केले असून आज ते विविध पोलीस स्थानकात सेवा बजावत आहे.

अभियंता ते उपनिरीक्षक-जोश ऑलवेज ऑन हाय लेवल

इंजिनिअरींग केले की गलेलट्ठ पगाराची नोकरी असा लोकांचा समज झालेला आहे त्यामुळेही युवकांनी मोठया प्रमाणात या क्षेत्राकडे धाव घेतलेली आहे. बॅचमधील सर्व अभियंते खासगी आस्थपनात कामाला होते. गोवा पोलीस दलातील उपनिरीक्षक भरतीत नशीब आजमविले असता, पहिल्याच प्रयत्नात काहींना संधी प्राप्त झाली आहे. सर्व अभियंते खाकी परिधान करून देशसेवा करण्याची संधी लाभल्याने उत्सवी मुडमध्ये आहेत. या बॅचमधील तीघेजण फोंडा पोलीस  स्थानकात कार्यरत आहेत. त्या तिघांही उपनिरीक्षकांचा ‘जेश ऑलवेज ऑन हाय लेवल’ असाच पहायला मिळतो.

या बॅचमधील सर्व उपनिरीक्षक सद्या कोरोनाकाळात विविध पोलीस स्थानकात उत्कृष्ट सेवा बजावत आहेत. इलेक्ट्रोनिक, इलेक्ट्रिक, मेकेनिकल, कम्प्युटर अभियंत्याचा समावेश आहे.

Related Stories

‘नवरंग लाईट हाऊस’ घरगुती उपकरणासाठी खात्रीशीर नाव

Amit Kulkarni

मुरगाव पालिकेसाठी सोमवारी 34 उमेदवारी अर्ज दाखल, एकूण संख्या 54

Amit Kulkarni

कोविड हॉस्पिटलातून रुग्ण पळाला पण…

Patil_p

समिल वळवईकर यांच्याकडून कुंभारजुवे मतदारसंघात खत वाटप

Amit Kulkarni

ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, ब्रह्मानंद शंखवाळकर यांचा सत्कार

Amit Kulkarni

‘धाबरी कुरुवी’चा आंचिममध्ये प्रीमियर

Amit Kulkarni