Tarun Bharat

युवा भंडारी समितीचे कार्य कौतुकास्पद

प्रतिनिधी/ फोंडा

समाजपयोगी उपक्रम राबवून समाजाप्रती असलेली जबाबदारी पार पाडणाऱया युवा भंडारी समितीचे कार्य कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा, रक्तदान शिबीर तसेच सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजनातून नेतृत्व युवा कार्यकर्त्यानी सिद्ध करून दाखविले आहे असे प्रतिपादन अखिल गोवा भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी केले.

युवा भंडारी समितीतर्फे ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या आकशकंदील स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळय़ात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी फोंडा पालीकेचे माजी नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक, नगरसेवक रितेश नाईक, नगरसेविका अमिना नाईक, समाजसेवक दत्तप्रसाद नाईक, कुर्टी खांडेपारचे माजी सरपंच दादी नाईक, समाजाचे युवा अध्यक्ष सुप्राज नाईक तारी व महासचिव मशाल आडपईकर उपस्थित होते.

पुढे बोलताना अशोक नाईक यांनी युवा समितीकडून बरेच कार्यक्रम निश्चित केलेले आहेत त्याला आमच्या कार्यकारिणीकडून मान्यता असून त्यांना लागणारी सर्व मदत मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहिल असे त्यांनी सांगितले. यावेळी कोरोना लस चाचणीसाठी पुढाकार घेतलेल्या युवकांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर आकाशकंदील स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. सदर स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक सिमरन उसपकर, द्वितीय नताशा शिरोडकर, तृतीय रूपेश शिरोडकर, चौथे कार्तिक नाईक, पाचवे नितेश मापारी यांना प्राप्त झाली. त्याशिवाय विशांत गावडे, सुहानी परब, यतिन शेटय़े यांना पारितोषिके व प्रशस्तीपत्रके देण्यात आली.

स्वागत व प्रास्ताविक सुप्राज नाईक यांनी केले. सुत्रसंचालन मशाल आडपईकर यांनी तर रणजीत उसगावकर यांनी आभार मानले.

Related Stories

पेडणे तालुक्मयात शनिवारी 11 उमेदवारी अर्ज

Patil_p

कुंभारजुवेचे सुरेंद्र नाईक यांचा समिल वळवईकर यांना पाठिंबा

Amit Kulkarni

चॅट बॉक्स (प्रकाश) ऍपचे आज उद्घाटन

Amit Kulkarni

25 कोटी खर्चून आग्वाद तुरुंग संग्रहालयाचे नूतणीकरण- मायकल लोबो

Patil_p

गुरूवारी दाबोळी विमानतळावर 96 प्रवासी दाखल

Patil_p

कॅप्टन विरियाटो फर्नांडिस यांचा दाबोळीतून लढण्याचा मानस

Patil_p