Tarun Bharat

युवा लेगस्पिनर रवी बिश्नोईला टी-20 पदार्पणाची संधी

Advertisements

विंडीजविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, कर्णधार रोहित शर्मा तंदुरुस्त, कुलदीप यादव-दीपक हुडाचे पुनरागमन, बुमराह-शमीला विश्रांती

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

युवा लेगस्पिनर रवी बिश्नोईला विंडीजविरुद्ध होणाऱया आगामी टी-20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघात पदार्पणाची संधी लाभली असून अनुभवी मनगटी फिरकीपटू कुलदीप यादवचे मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात पुनरागमन झाले. कुलदीप यापूर्वी गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर संघातून बाहेर फेकला गेला होता. जसप्रित बुमराह व शमीला मालिकेतून विश्रांती दिली असल्याचे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी नमूद केले.

कर्णधार रोहित शर्माने तंदुरुस्ती चाचणी पार केली असून या मालिकेसाठी तो संघात परतेल, हे अपेक्षेप्रमाणे निश्चित झाले. भारत-विंडीज यांच्यातील मर्यादित षटकांची मालिका दि. 6 फेब्रुवारीपासून सुरु होईल. उभय संघ पहिल्या वनडे लढतीच्या माध्यमातून आमनेसामने भिडतील, त्यावेळी या मालिकेचा बिगूल वाजणार आहे.

बडोदा संघाचा फलंदाज दीपक हुडाचे पुनरागमन देखील या निवडीतील आणखी एक वैशिष्टय़ आहे. दीपक हुडाने राज्यस्तरावर संघ बदल केला आणि सईद मुश्ताक अली व विजय हजारे चषक स्पर्धेत राजस्थानतर्फे लक्षवेधी योगदान दिले. हुडाला मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात फिनिशरच्या भूमिकेसाठी उत्तम पर्यायी खेळाडू म्हणून ओळखले जाते. 4 हंगामापूर्वी बांगलादेशमध्ये निदाहास चषक स्पर्धेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश होता. मात्र, त्यावेळी त्याला प्रत्यक्षात एकाही लढतीत खेळण्याची संधी मिळाली नाही.

वरिष्ठ खेळाडूंमध्ये रविचंद्रन अश्विनला मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघातून वगळले गेले तर कोरोनामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत खेळू न शकलेल्या वॉशिंग्टन सुंदरचे येथे पुनरागमन झाले. उपकर्णधार केएल राहुल कुटुंबातील एका सोहळय़ामुळे पहिल्या लढतीत उपलब्ध असणार नाही, तो दुसऱया वनडेसाठी संघात दाखल होईल.

तसेच रविंद्र जडेजा अद्याप सावरत असल्याने तो पूर्ण मालिकेत खेळू शकणार नाही, हे या निवडीत स्पष्ट झाले.

रवी बिश्नोई हा आयपीएल स्पर्धेत पंजाब प्रँचायझीचे फाईंड ठरला असून पुढील आयपीएलमध्ये तो नवे प्रँचायझी लखनौ सुपर जायंटकडून खेळणार आहे.

कोहली व रवी शास्त्री यांच्या पर्वात दुर्लक्ष झालेला कुलदीपवर संघव्यवस्थापन व निवड समितीने पुन्हा विश्वास दाखवला. गतवर्षी सप्टेंबरमध्ये कुलदीपवर गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली होती.

भारत-विंडीज मालिकेची रुपरेषा

तारीखलढतठिकाण
6 फेब्रुवारीपहिली वनडेअहमदाबाद
9 फेब्रुवारीदुसरी वनडेअहमदाबाद
11 फेब्रुवारीतिसरी वनडेअहमदाबाद
16 फेब्रुवारीपहिली टी-20कोलकाता
18 फेब्रुवारीदुसरी टी-20कोलकाता
20 फेब्रुवारीतिसरी टी-20कोलकाता

वनडे संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चहर, शार्दुल ठाकुर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान.

टी-20 संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकुर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, हर्षल पटेल.

Related Stories

कमिन्स, वॉर्नर, हॅजलवूड, मॅक्सवेल पाक दौऱयातून बाहेर

Patil_p

न्यूझीलंडने हिसकावला इंग्लिश विजयाचा घास!

Patil_p

बांगलादेश विजेते, भारताला उपविजेतेपद

Amit Kulkarni

ऍस्टन व्हिलाचे अवघ्या 9 मिनिटात 3 गोल!

Patil_p

प्रो बॅडमिंटन लीग लांबणीवर

Patil_p

मायभूमीत परतल्याचा आनंद वेगळा

Patil_p
error: Content is protected !!