Tarun Bharat

युवा शक्तीच्या आधारे राजकारणाला नवी दिशा देणार : फळदेसाई

गोवा सुरक्षा युवा मंच राज्य कार्यकारिणी जाहीर : दत्ताराम हरमलकर अध्यक्षपदी नियुक्त

प्रतिनिधी / पणजी

युवा वर्गाच्या आधारे गोव्यातील राजकारणाला नवीन विधायक व सकारात्मक दिशा देणे तसेच पक्षाचे कार्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे या हेतूने गोवा सुरक्षा मंचाने आपल्या युवा राज्य कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या कार्यकारिणीवर अध्यक्षपदी दत्ताराम हरमलकर यांची निवड करण्यात आली आहे.

पक्षाचे अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ही कार्यकारिणी जाहीर केली. हा राज्यस्तरीय भविष्यात स्वच्छ राजकारण देण्याचा प्रयत्न करेल व ग्रामपंचायत, नगरपालिका, विधानसभा तसेच लोकसभा अशा सर्व स्तरांवरील निवडणुकीत भाग घेणार आहे. त्यात युवा वर्गाला प्रतिनिधीत्व देण्यात येईल, असे फळदेसाई यांनी सांगितले.

पक्षाचा विस्तारा आणि समाजोपयोगी उपक्रम यांची योग्य सांगड घालून युवा पिढीसमोर असणारी आव्हाने व त्यांचे समाधान करण्यासाठी आवश्यक असणारे युवा कृती सामर्थ्य निर्माण करण्यात युवा मंच महत्वाची भूमिका वठवणार आहे. त्या अनुषंगाने विविध उपक्रम युवा मंच हाताळणार आहे. त्यासाठी सर्व युवकांनी या समाजनिर्मिती कामात सहभागी व्हावे, असे आवाहनही मंचातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, निवड करण्यात आलेल्या समितीत उपाध्यक्षपदी स्वरूप नाईक व बाबू गावकर, सरचिटणीस व उत्तर गोवा अध्यक्षपदी शिवाजी वझरकर, दक्षिण गोवा अध्यक्ष – आलोक मोडक, सचिव – निळकंठ कुंभार, सहसचिव – अजय नाईक, महाविद्यालयीन प्रमुख – शशांक नाईक, प्रसिद्धी प्रमुख – रजत बाक्रे, कायदा विभाग – अमित वेरेकर, कोषाध्यक्ष – संजय नाईक, यांचा समावेश करण्यात आला. त्याशिवाय सदस्यपदी सिद्धलिंग पत्तार, कृष्णा वेळुसकर, मयुर इंदुलकर, सुबोध मोने, रुद्राक्ष शेटगांवकर, शशिकांत पेडणेकर, प्रसाद जोग, सिद्धेश उगाडेकर, ज्ञानेश्वर नाईक, अभिजीत गांवकर, केदार कामत व साहील सतरकर यांची निवड करण्यात आली.

Related Stories

गोवा प्रवेशावर 10 पासून कडक निर्बंध घाला

Omkar B

कार्यकर्त्यांमधून आलेल्या नावांतूनच उमेदवार निवडू

Amit Kulkarni

इब्रामपूर येथे अखंड भजनी सप्ताह सुरु

Amit Kulkarni

1961 चा रेकॉर्ड मोडण्यास मान्सून सज्ज

Patil_p

दाबोळी विमानतळावर 50 लाखांचे सोने जप्त

Patil_p

आयआयटी सीमांकन विरोधात आंदोलक पुन्हा रस्त्यावर

Patil_p
error: Content is protected !!