Tarun Bharat

यूथ बँक ‘ आठवड्यात सुरु होणार

निर्बधानंतर अल्पावधीत सुरु होणारी महाराष्ट्रातील ‘ यूथ बँक ‘ ही पहिलीच बँक

कोल्हापूर / प्रतिनिधी

एकेकाळी यशो शिखरावर असलेल्या यूथ बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावले होते. पण संचालक मंडळाच्या अथक प्रयत्नाने बँक येत्या आठवडाभरात सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हालचाली गतीमान झाल्या असून बँक प्रशासनही सज्ज झाले आहे. योग्य व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन केल्यामुळे २ वर्षातच बँकेची आर्थिक गाडी रुळावर आली आहे . या बँकेचे नेतृत्व सध्या, चेतन नरके करत आहेत. देशविदेशातील विविध संस्थांवर ते काम करत आहेत. राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय अर्थ व्यवस्थेचा त्यांना गाढा अभ्यास आहे.

त्यामुळे बँकेची गाडी रुळावर आणण्यासाठी त्यांच्या या अनुभवाचा आणि प्रयत्नांचा मोठा फ़ायदा झाला आहे . परिणामी येत्या आठवडाभरात बँक पुन्हा एकदा सेवेत रुजू होणार आहे. बँकेची सध्याची सांपत्तिक स्थिती भक्कम आहे . बँकेकडील निधी , गुंतवणूक , रोखता पाहूनच रिझर्व्ह बँक कर्ज वाटप व ठेवी स्विकारण्यास परवानगी देण्याची दाट शक्यता आहे . मात्र कोणत्याही बँकांना ठेवीतून मिळालेली सर्व रक्कम स्वतःजवळ रोख स्वरुपात ठेवता येत नाही

त्यामुळे बँकेच्या सुरक्षिततेसाठी पर्यायाने ठेवीदारांच्या हितासाठी बँकेचे संपूर्ण व्यवहार टप्याटप्याने चालू होतील असा अंदाज आहे . पण बँकेची आर्थिक परिस्थिती व बँकेकडील तरलता भक्कम असलेने सर्व ठेवी सुरक्षित आहेत व बँक डिपॉझीट इन्श्युरन्सची सभासद असून विम्याचे हप्ते नियमित भरले आहेत . बँक प्रशासनाकडून यापुढे एच.डी.एफ.सी. आय. सी. आय. सी.आय. या खासगी क्षेत्रातील प्रगतशील बँकांच्या धर्तीवर कामकाज करुन बँकेला भरारी देण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे .

Related Stories

वरसोली येथे पॅरासेलिंग अपघात ; दोन महिला बचावल्या

Abhijeet Khandekar

पन्हाळा येथे तलावात बुडून एकाचा मृत्यू

Archana Banage

बेकरीच्या काऊंटरमधून रोकड लंपास

Archana Banage

महापालिकेवर ‘बीग बॉस’ची नजर

Kalyani Amanagi

ग्रामपंचायत निवडणूक : सडोली खालसा येथील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

Archana Banage

गृहराज्यमंत्र्यांच्या चमच्यांनी जास्त उडय़ा मारू नयेत : धनंजय महाडिक

Archana Banage