Tarun Bharat

यूपी, उत्तराखंडमधील राज्यसभेच्या 11 जागांसाठी 9 नोव्हेंबरला निवडणूक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

उत्तरप्रदेशातील 10 आणि उत्तराखंडमधील राज्यसभेच्या एका जागेसाठी 9 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. 20 ऑक्टोबरला या निवडणुकीची अधिसूचना जाहीर होईल. 27 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून, 9 नोव्हेंबरला मतदानादिवशीच सायंकाळी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

समाजवादी पक्षाचे पाच, भाजप, बसप आणि काँग्रेसचे प्रत्येकी तीन सदस्यांचा सहा वर्षाचा कार्यकाळ 25 नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. निवृत्त झालेल्या सदस्यांमध्ये चंदपालसिंग यादव, जावेद अली खान, अरुण सिंग, नीरज शेखर, पीएल पुनिया, हरदीपसिंग पुरी, रविप्रकाश वर्मा, राजाराम, राम गोपाल यादव, वीर सिंग आणि राज बब्बर यांचा आहे.

निवडणूक आयोगाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, दोन राज्यांमध्ये निरीक्षक म्हणून मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणुकीची व्यवस्था करताना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सूचना देण्यासाठी एक वरिष्ठ अधिकारी तैनात करण्याच्या सूचना दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांना देण्यात आल्या आहेत.

Related Stories

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी निलंबित

Archana Banage

योगी सरकारकडून पात्र विद्यार्थांना दिला जाणार लॅपटॉप

Tousif Mujawar

गडचिरोलीत 2.20 कोटींची रोकड जप्त

datta jadhav

ईश्वरप्पा यांनी मंत्रिपदाचा दिला राजीनामा

Archana Banage

खासदार धैर्यशील माने यांना कोरोनाची लागण

Archana Banage

चिंताजनक : पंजाबमधील कोरोना रुग्णांची संख्या 60 हजार पार

Tousif Mujawar