Tarun Bharat

यूपी : पंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

Advertisements

4 टप्प्यात मतदान; आचारसंहिता लागू

ऑनलाईन टीम / लखनऊ : 

उत्तर प्रदेशात निवडणूक आयोगाने आज पंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. उत्तर प्रदेशात 75 जिल्ह्यांमध्ये चार टप्प्यात पंचायत निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 15 एप्रिल रोजी होणार आहे. दुसरा टप्पा 19 एप्रिलला, 26 एप्रिलला तिसरा टप्पा आणि चौथा टप्पा 29 एप्रिलला होणार आहे. तर 2 मे रोजी मतमोजणी होईल.

सीतापूरच्या 3, बहराच 1 आणि गौंडाच्या 9 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण न झाल्याने तिथे निवडणूक होणार नाही. पहिल्या टप्प्यातील सर्व 18 प्रभागांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मतदान होईल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 

Related Stories

हुंडय़ाविरोधात केरळमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने

Patil_p

फायझरचे एमडी श्रीधर यांचा राजीनामा

Patil_p

त्रालमध्ये दहशतवाद्यांचे 5 मदतकर्ते अटकेत

datta jadhav

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा दौऱ्यावर, पूरग्रस्त भागांना देणार भेट

Rohan_P

गुजरातमध्ये आज २७ मंत्री घेणार शपथ

Patil_p

जितेंद्र आव्हाडांकडून रक्तदान करण्याचे आवाहन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!