Tarun Bharat

यूपी : 9 रेल्वे स्टेशनसह धार्मिक स्थळांवर बॉम्ब हल्ल्याची धमकी

Advertisements

ऑनलाईन टीम / लखनऊ :

मेरठ येथील शहर रेल्वे स्थानकावर पोस्टाने एक पत्र प्राप्त झाले आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील 9 रेल्वे स्थानके आणि धार्मिक स्थळांवर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.

मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता मेरठ येथील शहर रेल्वे स्थानकावर पोस्टाने हे पत्र प्राप्त झाले आहे. हे पत्र मेरठ सिटी रेल्वे स्टेशन अधीक्षकांच्या नावाने पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मी माझ्या जिहादींच्या मृत्यूचा नक्कीच बदला घेईन. खुदा, मला माफ कर, आम्ही भारताचा नाश करू. 26 नोव्हेंबर रोजी गाझियाबाद, हापूर, मेरठ, मुझफ्फरनगर, अलीगड, खुर्जा, कानपूर, लखनौ, शाहजहापूर सह अनेक रेल्वे स्थानकांवर बॉम्बहल्ला केला जाईल. 6 डिसेंबर रोजी अयोध्येतील हनुमानगढी, रामजन्मभूमी, अलाहाबाद, गाझियाबाद, मेरठ, मुझफ्फरनगर आणि सहारनपूरसह उत्तर प्रदेशमधील अनेक मंदिरांवर बॉम्बहल्ला केला जाईल.

अशा प्रकारची तीन धमकीची पत्र आतापर्यंत मिळाली आहेत. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने उत्तरप्रदेशातील 46 रेल्वे स्थानके बॉम्बने उडविण्याची धमकी दिली होती. दरम्यान, या पत्रांनंतर रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाढविण्यात आली असून, आरपीएफने बॉम्ब विल्हेवाट लावण्याच्या पथकासह रेल्वे स्थानकावर तपासणी मोहीम सुरू केली.

Related Stories

लादेनचा खात्मा करणारे शूर आयटीबीपीमध्ये

Patil_p

मोठी कारवाई : भारतीय लष्कराने उरी सेक्टरमध्ये केले २५ कोटींचे ड्रग्स जप्त

Abhijeet Shinde

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 2.40 कोटींवर

datta jadhav

‘आप’ला धक्का, चंदीगडमध्ये भाजपचा महापौर

Patil_p

सलग सहाव्या दिवशी पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ

Rohan_P

कोल्हापूरचा सर्वांगिण विकास हाच प्रमुख अजेंडा खा.धनंजय महाडिक यांची माहिती

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!