Tarun Bharat

येडियुरप्पा यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

बेंगळूर/प्रतिनिध

 कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा  यांनी अखेर राजीनामा दिला आहे. “मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. जेवल्यानंतर राज्यपालांना भेटू” असं त्यांनी कर्नाटक सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सोहळ्यात सांगितलं. 

कार्नाटकमध्ये गेले काही दिवस मुख्यमंत्रीपदावरुन नाराजी नाट्य सुरु होतं. तसंच, काही दिवसांपूर्वी येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. त्यानंतर येडियुरप्पा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. दरम्यान, येडियुरप्पा यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आज ते दुपारी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेत राजीनामा देणार आहेत.

बी.एस. येडियुरप्पा यांनी प्रतिक्रिया देताना कर्नाटकातील जनतेसाठी अजून बरच काही करायचं आहे. आपण सर्वांनी परिश्रम घेतले पाहिजे, असं म्हणाले. त्यांना नेहमीच अग्नीपरीक्षेतून जावं लागलं, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

Related Stories

ओसीआय कार्ड धारकांसंबंधी केंद्र कठोर

Patil_p

लडाख LAC च्या 9 किमी अंतरावर चिनी सैन्यांचे 16 कॅम्प

datta jadhav

सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

datta jadhav

पोटनिवडणुकीत भाजपचा विजय निश्चित : मुख्यमंत्री

Amit Kulkarni

माजी खासदार पप्पू यादव यांना झटका

Patil_p

राहुल गांधींचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

Patil_p