Tarun Bharat

येडियुराप्पा मार्गावर वैद्यकीय कचरा टाकल्याने नागरिकांमधून संताप

प्रतिनिधी /बेळगाव

शहरात कचऱयाची समस्या गंभीर बनलेली असतानाच आता हॉस्पिटलमधील आणि आरोग्य केंद्रांतील कचरादेखील उघडय़ावर टाकण्यात येत आहे. येथील बी. एस. येडियुराप्पा मार्गावर वैद्यकीय कचरा टाकण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे हॉस्पिटल्स व आरोग्य केंदे या ठिकाणी लस देण्यात येत आहे. यासह गल्लोगल्लीतही उपक्रम राबवून नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, लसीकरण झाल्यानंतर सिरिंज आणि इंजेक्शनच्या बाटल्या उघडय़ावर टाकण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी येथील बी. एस. येडियुराप्पा मार्गावर कचरा टाकण्यात आला आहे. या कचऱयात दिवसेंदिवस वाढ होत असून संबंधित व्यक्तींनी या ठिकाणी वैद्यकीय कचरा टाकू नये, अन्यथा त्यांच्यावर कडक  कारवाई करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Related Stories

विद्यार्थ्यांची सुरक्षा घेऊनच दहावीच्या परीक्षा होणार

Patil_p

चापगाव येथील फोंडेश्वर यात्रा भक्तिभावाने साजरी

Amit Kulkarni

जितोच्या राष्ट्रीय कार्य कारिणीमध्ये भारती हरदी यांची निवड

Patil_p

हिंदू युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ खानापूर हिंदू संघटनेचा निषेध मोर्चा

Amit Kulkarni

शहरातील रस्ते पार्किंग-फेरीवाल्यांच्या विळख्यात

Amit Kulkarni

पं. नेहरु कॉलेज विद्यार्थ्यांची पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Amit Kulkarni