Tarun Bharat

येणकेतील बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश

कराड / प्रतिनिधी :

येणके (ता.कराड) येथे ऊस तोड मजुरांच्या मुलावर हल्ला केलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला अखेर यश आले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने सापळे लावले होते. सापळ्याच्या परीसरात बिबट्या येत असल्याचे कॅमेरात कैद झाले होते. मात्र बिबट्या सापळ्यात येत नव्हता. अखेर शुक्रवारी रात्री बिबट्या सापळ्यात अडकल्याने वन विभागासह येणके परीसरातील नागरीकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

कराड तालुक्यातील येणके, पोतले, तांबवे, किरपे, येळगाव परीसरातील पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तर येथील नागरिकांना बिबट्या दर्शन नेहमीच होत असल्याने परीसरात भितीचे वातावरण होते. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणीही अनेकदा करण्यात आली होती. दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी आई सोबत शेतात निघालेल्या चार वर्षीय ऊस तोड मजुराच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडा जागीच ठार झाला होता. या भयानक घटनेने कराड तालुका हादरला होता. यावेळी संतप्त नागरिकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.


त्यानुसार वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी दोन ठिकाणी पिंजरे ठेवले होते. तर शोधमोहीमही राबवली होती. वन विभागाने लावलेल्या कॅमेरात बिबट्या कैद झाला होता. शुक्रवारी रात्री अखेर बिबट्या सापळ्यात अडकला. बिबट्याला पहाण्यासाठी नागररीकांनी मोठी गर्दी केली होती. वन विभागाने बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हालवले असुन वैद्यकीय तपासणी व इतर सोपस्कार पूर्ण करुण बिबट्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

Related Stories

सातारा : तारळे येथे बाधित रुग्णाची हेळसांड

Archana Banage

खते, बियाणे विक्री गैरप्रकाराबाबत जिल्हा परिषदेचे तक्रारीचे आवाहन

Archana Banage

सातारा : हुतात्मा सुरज लामजे अनंतात विलीन

Archana Banage

लॉकडाऊन विरोधातील व्यापाऱयांचे आंदोलन मोडीत

Patil_p

ठेकेदाराच्या मनमानीविरोधात नगरसेवकाने दिला आत्मदहनाचा इशारा

datta jadhav

सह्याद्री हॉस्पीटलमधील सहा जण झाले कोरोना मुक्त

Archana Banage