Tarun Bharat

येणाऱया निवडणूकांमध्ये भाजपला बहुमताने विजयी करणे हेच ध्येय

प्रतिनिधी / पणजी :

मनोहर पर्रीकर हे माझे आदर्श आहे. सुमारे 1991 सालापासून मी मनोहरभाई यांच्यासोबत काम करत आहे. त्यामुळे मनोहरभाई पर्रीकर यांच्या समाधीला आदरांजली अर्पण करुन मी प्रदेशाध्यक्ष पदाचा ताबा घेणार आहे. असे भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर सदानंद शेट तानावडे यांनी मिरामार येथील माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या समाधीला भेट देऊन आदरांजली वाहीली यावेळी सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मी बिनविरोध ही निवडणूक जिंकलो त्यामुळे स्वाभाविकरित्या पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मला पाठींबा लाभला आहे. सर्वांना सोबत घेऊनच मी पक्षाचे काम पुढे नेणार आहे. याआधी मी अनेक वेळा सचिव म्हणून काम पाहिले आहे. सचिव आणि अध्यक्ष याच्यात खुप फरक आहे. आज माझ्यावर मोठी जबाबदारी असून कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक टीम म्हणून आम्ही पुढे काम करणार आहोत. असे सदानंद शेट तानावडे यांनी पुढे सांगितले.

आता येणाऱया मार्च महिन्यात जिल्हा पंचायत होणार आहे. उत्तर गोवा व दक्षिण गोव्यात दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडणून आणायची मोठी जबाबदारी सध्या आहे. तसेच या नंतर पालिका निवडणूकी होणार आहे. यामध्ये आम्हाला बहुमताने विजयी व्हायचे असेल तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली खुप कामे करायला पाहिजे. असेही सदानंद शेट तानावडे यांनी अधिक बोलताना सांगितले.

स्व. मनोहरभाई पर्रीकर यांच्या समाधीला आदरांजली अपर्ण केल्यानंतर नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष यांनी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीला भेट देऊन आदरांजली वाहीली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासोबत पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात, गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई, बाल भवनच्या अध्यक्षा डॉ. शितल नाईक, दत्तप्रसाद नाईक, माजी महापौर शुभम चोडणकर, विठ्ठल चोपडेकर, वैदेही नाईक, व इतर पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर तानावडे यांनी पणजी येथील महालक्ष्मी देवीचा आर्शिवाद घेता.

Related Stories

अटलसेतूच्या खचलेल्या भागात काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण

Patil_p

मडकई श्रीनवदुर्गा जत्रोत्सवासाठी अधिकाऱयाची नेमणूक करा

Amit Kulkarni

फोंडय़ातील ‘मॅन विथ गोल्डन आर्म’ रक्तदाते

Amit Kulkarni

कट्टर मराठीप्रेमी, माजी आमदार विनायक नाईक यांचे निधन

Amit Kulkarni

दाबोळी विमानतळावर देशी पर्यटकांचा ओघ

Patil_p

सांगे येथे साकारणार ‘हातमाग ग्राम’

Omkar B