Tarun Bharat

येत्या ऑक्टोबरपासून लहान मुलांना देणार Zycov-D लस

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतातील लसीकरण मोहिम आता अधिक वेगाने वाढत आहे. आता ऑक्टोबर महिन्यापासून देशातील 12 वर्षांवरील मुलांना कोरोना लस दिली जाणार आहे. 12 ते 17 या वयोगटातील मुलांना जायडस कॅडिला ही लस देण्यात येणार आहे.

सरकारच्या कोविड 19 वर्किंग ग्रुप कमिटीचे प्रमुख डॉ. एन के अरोरा यांनी सांगितले की, ही लस सर्वप्रथम गंभीर आजाराशी झुंज देणाऱया मुलांना दिली जाईल. डीसीजीआय कडून या साठीची परवानगी मिळली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापासून लस मुलांना देण्यात येणार आहे. देशात 12 ते 17 वर्षांदरम्यानच्या मुलांची एकूण संख्या ही 12 कोटी आहे. तंदुरुस्त मुलांमध्ये कोरोनाने गंभीर आजार किंवा मृत्युची शक्यता खूप कमी असते किंवा नसतेच. सरकारला चिंता फक्त गंभीर आजार असलेल्या मुलांची आहे. यामुळे गंभीर आजार असलेल्या लहान मुलांना कोरोनाची लस सर्वात आधी दिली जाणार आहे.

पुढे ते म्हणाले, देशात 18 वर्षांखालील सुमारे 44 कोटी मुले आहेत. मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या बौद्धिक विकासासाठी शाळा पुन्हा सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. मुले शाळेत जाऊ शकतात. लसीकरणाची गरज नाही. पण ती सुरक्षित असायला हवी. त्यांच्या आजूबाजूला सुरक्षेची एक ढाल तयार करणे आवश्यक आहे. म्हणूनच त्यांचे पालक आणि शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी याचे लसीकरण पूर्ण झाल्याची खात्री करायला हवी.

दरम्यान, झायडस कॅडिलाच्या Zycov-D या लसीला मंजुरी मिळाल्यानंतर देशात आता कोरोनावरील एकूण 6 लस उपलब्ध झाल्या आहेत. या लसीची 28,000 हून अधिक व्हॉलेंटियर्सवर चाचणी करण्यात आली आहे. ही लस 66.6 टक्के प्रभावी आहे.

Related Stories

प्रमोद सावंतच होणार गोव्याचे मुख्यमंत्री, होळीनंतर घेणार शपथ

Archana Banage

पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्यास पाणीपुरवठ्यात येणार व्यत्यय

Rohit Salunke

सोनू सूदने २० कोटी रुपयांचा कर चुकवला: आयकर विभाग

Archana Banage

16 दिवसांचे नवरात्र

Patil_p

दुहेरी नागरिकत्वामुळे इम्रान खान यांच्या 4 सल्लागारांना हटवण्याची मागणी

datta jadhav

मुंबईत घरोघरी जाऊन सध्या तरी कोरोना लस नाही : किशोरी पेडणेकर

Archana Banage