Tarun Bharat

येत्या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिक महाविद्यालय होणार कार्यान्वीत

Advertisements

तंत्रनिकेतनचे प्राचार्य औ़ म़ जाधव यांची माहीती: नव्या महाविद्यालयासाठी इमारतीचे काम हाती

प्रतिनिधी / रत्नागिरी

.अखिल भारतीय तंत्र शिक्षण परीषदेच्या निकषाप्रमाणे पायाभूत सुविधांच्या पाहणी नुकतीच परीषदेच्या पथकाने केली असून अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी आवश्यक इमारतीचे काम गतीने चालू होणार आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे वर्ग पॉलिटेक्निकच्या नवीन विस्तारित इमारतीमध्ये सुरु होणार असल्याची माहीती शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य औ़ म़ जाधव यांनी दिल़ी 

    नवीन विस्तारीत इमारतीचे क्षेत्र 1905 स्क्वेअर मीटर असून नवीन बांधकाम उपलब्ध होत नाही, तोपर्यंत या इमारतीत प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे वर्ग भरणार असल्याची माहीती जाधव यांनी दिल़ी नव्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य 1, प्राध्यापक 6, सहयोगी प्राध्यापक 15 ,सहाय्यक प्राध्यापक 43  शिक्षकेतर कर्मचारी 50 असे एकूण 115 कर्मचारी असणार असून पहिल्या वर्षी यापैकी 29 पदांची आवश्यकता आह़े दरम्यान अभियांत्रिकी महाविद्यालयाबरोबरच तंत्रनिकेतन देखील सुरुच राहणार असल्याचे प्राचार्यांनी स्पष्ट केले आह़े नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयामुळे कोकणातून दर्जात्मक अभियंते तयार होतील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते, त्यानुसार कार्यवाही युद्धपातळीवर करण्यात येत असल्याचे प्राचार्यानी सांगितल़े

  नव्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेपॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, सिव्हिल व इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजेंन्स व डेटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि फूड टेक्नॉलॉजी व मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. या विभागांमध्ये प्रत्येकी 60 अशी एकूण 300 प्रवेश क्षमता असलेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यावर्षीपासून  सुरू होत आहे. नव्या महाविद्यालयासाठी 152.53 कोटी रूपये खर्च येणार असून राज्य शासनाने यासाठी निधीची तरतूद केली आह़े 

सुरुवातीला औषधनिर्माण, तंत्रनिकेतनच्या जागेचा वापर

अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी प्रयोगशाळा महत्त्वाच्या असून पदवी अभ्यासक्रमासाठी आवश्यक प्रयोगशाळा प्रांभी तात्पुरत्या  स्वरुपात शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील उपलब्ध जागेत करण्यात येणार आह़े नव्या इमारतीअभावी विद्यार्थींची गैरसोय होवू नये म्हणून तंत्रनिकेतनच्या इमारतीचा वापर करण्यात येणार आह़े

Related Stories

उपमुख्यमंत्र्यांचीही संपकरी एसटी कर्मचाऱयांकडे पाठ

Patil_p

पावस बाजारपेठेतून तरूणाचे अपहरण

Patil_p

दापोलीत तोतया अन्नभेसळ अधिकाऱ्याचा पर्दाफाश

Archana Banage

स्वा.लक्ष्मी चौकात ‘पे ऍन्ड पार्क’ नको!

Patil_p

चिपळुणात मांडूळ जातीच्या सापाची तस्करी

Patil_p

दापोलीतील संतोष मेहता यांचे दुःखद निधन

Archana Banage
error: Content is protected !!