Tarun Bharat

येत्या 1 महिन्यानंतर मच्छीमारांना क्यार वादळाची नुकसानी मिळणार

 सहाय्यक मत्स्य आयुक्तांच्या आश्वासनामुळे आमरण उपोषण स्थगित

वेंगुर्ले / वार्ताहर:

जिल्ह्यातील कांही रापण संघ, नौकाधारक व लहान मासळी विक्रेते यांना विशेष आर्थिक सहाय्य देण बाकि असून त्यांचे करीता वाढीव अनुदान रूपये 4 कोटी 64 लाखाच्या अतिरीक्त निधीची मागणी वरीष्ठ कार्यालयाकडे करण्यातं आली आहे. शासन स्तरावर झालेल्या चर्चेनुसार निधी मिळण्यासाठी सुमारे पुढील एक महिन्याचा कालावधीत लागण्याची शक्यता आहे. निधी प्राप्त होताच जिल्हा लाभार्थी समितीची सभा घेऊन त्यानंतर मत्स्य सहकारी संस्थेच्या पात्र सदस्य यांचे बँक खात्यात निधी वितरीत करण्याची कार्यवाही करण्यातं येईल. असे आश्वासन मालवणचे मत्स्य सहाय्यक आयुक्त रविंद्र मालवणकर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीसाठी हे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यातं आले आहे. संस्थेच्या शिफारशींसह व सर्व कागदपत्रांसह परीपूर्ण प्रस्ताव परवाना अधिकारी यांचेमार्फत तपासणी करून पात्र लाभार्थीं प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झाल्यावरच लाभार्थी निवड समितीच्या मंजुरीने निधी मंजूर करून त्याचे वितरण करण्यात येते.विशेष आर्थिक सहाय्य मिळणेस्तव मच्छीमारी संस्थाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील कांही रापण संघ, नौकाधारक व लहान मासळी विक्रेते यांना विशेष आर्थिक सहाय्य देण बाकी असून त्यांचे करीता वाढीव अनुदान रूपये 4 कोटी 64 लाखाच्या अतिरीक्त निधीची मागणी वरीष्ठ कार्यालयाकडे करण्यातं आली आहे. सदर निधी लवकर उपलब्द होण्याकरीता सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू आहे. शासन स्तरावर निधी मिळण्याकरीता वरीष्ठ कार्यालयाशी झालेल्या चर्चेनुसार निधी मिळण्यासाठी सुमारे पुढील एक महिन्याच्या कालावधीत निधी प्राप्त होताच  पात्र सदस्य यांचे बँक खात्यात निधी वितरीत करण्याची कार्यवाही करण्यातं येईल.  त्यामुळे सद्यस्थितीत कोविड-19 संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारू नये.असे लेखी पत्र सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालय, मालवण जिल्हा सिंधुदुर्ग यांनी धी मुठ उभादांडा मच्छिमार सहकारी संस्थेचे चेअरमन यांना मालवणच्या सहाय्यक मत्स्यआयुक्तांकडून मच्छीमार संस्थेस देण्यांत आले आहे.

Related Stories

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रत्नागिरीतील शेतकऱ्यांशी थेट संवाद ..!

Patil_p

देवरुख-रत्नागिरी मार्गावर झाड कोसळल्याने 2 तास वाहतुक ठप्प

Patil_p

खेर्डीतील ‘स्वामी समर्थ’ मार्केटिंग कंपनीच्या संचालकाला अटक

Patil_p

जिल्हा मंडप, लाईट, केटरर्स असोसिएशनने केला सरकारचा निषेध

Patil_p

समाज माध्यमावर मराठी माणसांना शिवीगाळ!

NIKHIL_N

रस्त्यात सापडलेले दीड लाख केले परत

Archana Banage