Tarun Bharat

येमेनमध्ये हल्ल्यात 80 सैनिक ठार

Advertisements

सना 

 येमेनच्या सैन्यतळामधील एका मशिदीवर झालेल्या क्षेपणास्त्र तसेच ड्रोन हल्ल्यात 80 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. मारिब येथे झालेल्या या हल्ल्यासाठी इराणचे समर्थनप्राप्त हुती बंडखोरांना जबाबदार ठरविले जात आहे. तर येमेन सरकारला सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील सैन्य आघाडीचा पाठिंबा आहे. मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण असताना हा हल्ला झाला आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात कमांडर कासिम सुलेमानी मारला गेल्यावर इराणने क्षेपणास्त्रांनी हल्ले केले होते. येमेनचे अध्यक्ष अबेदरब्बो मंसूर हादी यांनी हल्ल्याची निंदा केली आहे.

Related Stories

सौदी अरेबियात पुरुषांवर निर्बंध

datta jadhav

एअर इंडियासाठी अडचण

Patil_p

बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द

datta jadhav

सोमालियात दुष्काळामुळे पाण्यासह अन्नटंचाई तीव्र

Patil_p

रशियात बाधितांची संख्या 40 लाखांच्या उंबरठ्यावर

datta jadhav

जगभरातील बाधितांची संख्या 12 कोटींवर

datta jadhav
error: Content is protected !!