Tarun Bharat

येलमरवाडी खूनप्रकरणी दोघांना दि. 17 पर्यंत पोलीस कोठडी

प्रतिनिधी/ वडूज

 येलमरवाडी (ता. खटाव) येथील सत्तर वर्षीय हिराबाई दगडू जगताप या निराधार महिलेचा डोक्यात घाव घालुन खून केल्याप्रकरणी वडूज पोलीसांनी दोन जणांना अटक केली होती. तुळशिराम सखाराम बागल (वय 49) व श्रीमती संगिता देशमुख (वय 41) या दोन संशयितांना वडूज येथील प्रथम वर्ग न्यायाधिश पाठक यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना शुक्रवार दि. 17 पर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुणावली आहे.

         मयत हिराबाई दगडू जगताप रा. एनकुळ ता.खटाव ही निराधार असून आपला भाउ शामराव कांबळे व भाचा गौतम नलवडे यांच्या आश्रयाने ती आपल्या माहेरी येलमरवाडी येथे एकटीच राहात होती. ती गावामध्ये घरोघरी भाकरी मागुन उदरनिर्वाह करीत होती. सदरची महिला आपल्या अनैतिक संबंधास अडथळा ठरतेय याचा राग आल्याने बागल व संगिता देशमुख या दोघांनी तिच्या डोक्यात घाव घालून तिचा निर्घुण खून केला होता. याप्रकरणी मयताचा भाचा गौतम नलवडे यांनी पिर्याद दिली होती. याप्रकरणी वडूज, दहिवडी, औंध, म्हसवड या चार पोलीस ठाण्यातील अधिकार्यांनी प्रचंड मेहनत घेवून आरोपींना 12 तासाच्या आत अटक केली होती. जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, वडुजचे सपोनि मालोजी देशमुख, दहिवडी चे सपोनि संतोष तासगावकर, औंधचे सपोनि प्रशांत बधे, म्हसवडचे पी.एस.आय. भंडारे, शितल पालेकर यांच्यासह पो.ना.नितीन सजगणे, रमेश बर्गे, तानाजी चंदनशिवे, हावलदार शांतिलाल ओंबासे, चंद्रकांत वाघ, दादासाहेब देवकुळे, अश्विनी काळभोर, दर्याबा नाळे, संदिप शेडगे, सागर बडदे, दिपक देवकर, रविंद्र बनसोडे, संजय केंगले, भूषण माने, प्रशांत पाटील, सागर पोळ, कुंडलिक कटरे, सुनिल राऊत, दादा देवकुळे आदी पोलीस कर्मचार्यांनी येलमरवाडी गावास भेट देवून गावातील संशयित घरांची झडती घेण्याबरोबर अनेक लोकांशी चर्चा, विचार विनीमय करत खुणाचा छडा लावला.

भाकरीचा तुकडा जीवावर बेतला

         मयत हिराबाई जगताप ही वृध्द महिला गावामध्ये भाकरी-तुकडा मागून स्वतःचा उदरनिर्वाह करीत होती. दुपारच्या वेळी भाकरीच्या तुकडय़ासाठी ‘ त्यांच्या ’ घरी जाण्याची तिला दुर्बुध्दी सुचली. ही म्हातारी आपल्या अनैतिक संबंधाची गावभर बदनामी करेल या भितीनेच त्यांनी दोघांनी संगणमताने तिचा कायमचा काटा काढला. त्यामुळे केवळ भाकरीचा तुकडा म्हातारीच्या जीवावर बेतला. तसेच यापुढच्या काळात म्हातारी अडथळा नको या भावनेने ज्यांनी तिचा काटा काढला त्यांनाही तुरुंगाची हवा खायला लागल्याने नियतीनेही त्यांच्या संबंधावर घाला घातल्याची चर्चा गाव परिसरात आहे.

Related Stories

अनाथ मुलांना मिळणार शासकीय नोकरीत प्रथम प्राधान्य

Archana Banage

जिल्ह्यात बाधित वाढ शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न

datta jadhav

सोळा गुह्यातील फरार आरोपी जेरबंद

Patil_p

सातारा : ठोसेघरला आला “पर्यटकांचा बहर”

Archana Banage

हंडाभर पाण्यासाठी आखाडेवस्तीकरांची वणवण

Patil_p

रेशनच्या दुकानाला लागलेल्या आगीत साडे चार लाखाचे नुकसान

Patil_p