Tarun Bharat

येळापुरच्या वाघदऱ्यात गवे व रानडुकरांनी केले ५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Advertisements

कोकरूड वार्ताहर

येळापुरच्या वाघ दऱ्यात असणाऱ्या सात गव्यांनी आणि वीस पेक्षा जास्त डुकरांनी ५० हेक्टर पेक्षा जास्त ऊस, शाळू, हायब्रीड आदी पिकांचे नुकसान केले असून वनविभागाने नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करुन तातडीने भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

चांदोली अभयारण्याच्या लगत असणाऱ्या गुढे, पाचगणी, मानेवाडी, मणदूर,आरळा,मेणी,येळापुर तसेच वाडी-वस्तीवर असणाऱ्या गावात दररोज जंगलातील गवे, बिबटे, डुकरे या सारखी जनावरे येऊन शेळी, बकरी, कुत्रे, गायी-म्हैशी याच्यावर हल्ले करण्या बरोबरच शेतात उभे असणाऱ्या पिकांचे नुकसान करत आहेत. गुढे-पाचणगी पठारावर गव्यांचे दोन कळप आहेत. तर येळापुर येथील वाघ दऱ्यात सात गव्यांचा कळप असून वीस पेक्षा जास्त डुकरे असल्याने ऊस, शाळू, गहू, हरभरा, हायब्रीड आदी पिकांचे गव्या कडून कणसे खाल्ली जात आहेत. तर डुकरा कडून पिकांची नासधूस सुरु आहे.

शिराळा पश्चिम भागात दररोज गवे आणि डुकरांच्या कडून पिकांचे नुकसान होत असून ५० हेक्टर पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. दररोज रात्री दहा नंतर गवे आणि डुकरांचे आगमन होत असल्याने शेतकऱ्यांना रात्रभर पिकांची राखणी करावी लागत आहे.तरी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

Related Stories

”मोदींनी जगाला दिलेली शिकवण आधी स्वत: अंमलात आणावी”

Archana Banage

लोकसहभागातून सांगलीवाडी घाटाची स्वच्छता

Archana Banage

देशात 24 दिवसांमध्ये 30 ते 40 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण

Tousif Mujawar

राखी ऐवजी बांधले शिवबंधन!

Archana Banage

आमदार पडळकरांनी मारले मैदान; अखेर गनिमीकाव्याने बैलगाडी शर्यत संपन्न

Archana Banage

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान ; ‘या’ दिग्गजांनी बजवला मतदानाचा हक्क

Archana Banage
error: Content is protected !!