Tarun Bharat

येळ्ळूरमध्ये समितीच्या प्रचारफेरीला मोठा प्रतिसाद

प्रचारफेरीत पाच हजारहून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग : शुभम शेळके यांनाच निवडून देण्याचा येळ्ळूरवासियांचा निर्धार

प्रतिनिधी / येळ्ळूर

मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचाराने येळ्ळूर परिसर रविवारी दणाणून निघाला. बेळगाव, कारवार, निपाणीसह बिदर, भालकी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणांनी शुभम शेळके यांची प्रचारफेरी काढण्यात आली. गावात शुभम शेळके दाखल होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तरुणवर्ग मोठय़ा जल्लोषाने हातात भगवा घेऊन उतरला होता. जवळपास 5 हजारहून अधिक कार्यकर्त्यांनी प्रचारफेरीत भाग घेतल्याने तब्बल एक-दीड कि.मी. लांबीची प्रचारफेरी दिसत होती.

राष्ट्रीय पक्षांनी केलेल्या दडपशाहीविरोधात येळ्ळूरवासियांनी शुभम शेळके यांनाच मतदान करण्याचा एल्गार यावेळी केला. प्रचारादरम्यान शुभम शेळके यांचे सुवासिनींनी विविध ठिकाणी औक्षण केले. तरुणवर्ग मोठय़ा जल्लोषात बाहेर पडला होता. येळ्ळूरसह तालुक्यातील तरुणवर्गही सामील झाला होता. या प्रचारफेरीवरून शुभम शेळके यांचा विजय निश्चित होणार आहे.

अस्मितेसाठीच्या लढय़ास सज्ज

पोलिसांनी केलेल्या दडपशाहीच्या विरोधात येळ्ळूरवासियांचा असलेला राग या निवडणुकीतून दाखविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. गावातून प्रचारफेरी काढल्यानंतर गावचे आराध्यदैवत चांगळेश्वरी मंदिरासमोर सभा घेण्यात आली. यावेळी लोकसभा उमेदवार शुभम शेळके यांनी, तुम्ही आमच्यावर दडपशाही करत असाल तर मराठी जनता हिसका दाखविणार आहे. आम्ही आमच्या अस्मितेसाठी लढा देत आहे. यापुढेही तरुणवर्ग लढा देतच राहणार, हे निश्चित आहे. येथील मराठी भाषिकांचा आवाज लोकसभेत दाखवून देणार असून प्रत्येकाने मला मतदान करावे, असे आवाहन शुभम शेळके यांनी केले.

प्रारंभी येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी यांनी स्वागत केले. त्यानंतर प्रचारफेरीला सुरुवात झाली. या प्रचारफेरीमध्ये मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, ता. पं. सदस्य रावजी पाटील, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माजी महापौर सरिता पाटील, ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, म. ए. समिती युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, दुदाप्पा बागेवाडी, ग्रा. पं. सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, महेश कानशिडे, जोतिबा चौगुले, संजय सातेरी, मदन बामणे, दत्ता उघाडे यांच्यासह इतर आजी-माजी सदस्य उपस्थित होते. खानापूर तालुक्यातील गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत यांच्यासह इतर कार्यकर्ते प्रचारफेरीत सहभागी झाले होते.

Related Stories

होळी शांततेत साजरी करा

Amit Kulkarni

मणगुत्ती येथील “त्या” प्रकरणी दिनेश कदम यांना जामीन

Amit Kulkarni

कोल्हापूर निपाणी बससेवा बंद

Tousif Mujawar

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या निवडीची यादी लटकलेलीच

Omkar B

कंग्राळी बुद्रुक शेतकऱ्यांचा रास्तारोको

Amit Kulkarni

नर्सिंग विद्यार्थ्यांना विद्याश्री वेतन द्या

Omkar B
error: Content is protected !!