Tarun Bharat

येळ्ळूरच्या अरवाळी धरणात तरुणीची आत्महत्या

तरुणी भाग्यनगर येथील

प्रतिनिधी/ येळ्ळूर

येळ्ळूरच्या अरवाळी धरणामध्ये एका तरुणीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. सोनाली संजय सुरेकर (वय 18, रा. नववा क्रॉस, भाग्यनगर, पारिजात कॉलनी) असे त्या तरुणीचे नाव आहे. ही घटना काही प्रत्यदर्शींनी पाहिली. त्यांनी तातडीने तेथे धाव घेतली. काही तरुणांनी बांबू देऊन तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते प्रयत्न अपयशी ठरले आणि त्या तरुणीचा मृत्यू झाला.

सोनाली ही वडिलांची डीओ मोटारसायकल क्रमांक केए 22 एचबी 2904 घेऊन थेट येळ्ळूर येथील अरवाळी धरणाकडे गेली. दुचाकी बाजूला लावून त्यामधील डिकीत मोबाईल ठेवला. त्यानंतर ती पाणी सोडण्याच्या गेटवर चढली. तेथून तिने अचानक उडी घेतली. ती घटना काही मुलांनी पाहिली. त्यांनी तातडीने तेथे धाव घेतली. तेथे असलेला बांबू तिला देण्यासाठी प्रयत्न केला. मात्र तिच्या हाती तो बांबू मिळाला नसल्याने तिचा बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती बेळगाव ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी असलेल्या येळ्ळूरमधील काही तरुणांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्या दुचाकीच्या डिकीचा लॉक तोडून डिकीमधील साहित्य पाहिले असता त्यामध्ये तिचा मोबाईल आढळला. त्या मोबाईलवरून त्यांनी तिच्या घरच्यांना संपर्क साधला.

सोनाली हिचे वडील घटनास्थळी दाखल झाले. ही माझीच दुचाकी असून माझी मुलगीच आहे म्हणून तेथेच हंबरडा फोडला. यावेळी त्यांना सावरण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन काही वेळातच सोनालीचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. या घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

पंधरा मिनिटातच कोनवाळ गल्ली नाला तुडुंब

Amit Kulkarni

बेळगावातील दोन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Patil_p

औदुंबर तेंडोलकर यांना मदतीची गरज

Amit Kulkarni

वाहन जप्त करण्याचा आदेश देताच दिली नुकसान भरपाई

Patil_p

घराला अचानक लागली आग; दुकानही जळाले

Rohit Salunke

श्री साईगणेश सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत

Omkar B