Tarun Bharat

येळ्ळूर ग्राम देवतेची आज पूजा

नवनिर्वाचित सदस्यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम

प्रतिनिधी/ बेळगाव

येळ्ळूरची ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी मंदिरामध्ये नवनिर्वाचित सदस्यांच्या उपस्थितीत पूजा केली जाणार आहे. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार असून सर्व सदस्यांनी व म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये म. ए. समितीला अधिक जागा मिळाल्या आहेत. याचबरोबर समस्त जनतेनेही म. ए. समितीच्या पाठीशी ठाम राहिल्याचे दाखवून दिले आहे. श्री चांगळेश्वरी देवीच्या आशीर्वादानेच हे शक्य झाले आहे. त्यामुळे शुक्रवारी पूजा करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन म. ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी यांनी केले आहे.    

Related Stories

बेळगावात पोलिसांना कोरोनाचा धोका वाढला

Tousif Mujawar

मारुती गल्ली शाळा क्र. 1 चे छत पावसामुळे कोसळले

Omkar B

जिल्हय़ातील 32 जण झाले कोरोनामुक्त

Amit Kulkarni

कांदा, बटाटा, रताळी दरात वाढ

Patil_p

शिक्षक प्रशिक्षण सक्तीचा घाट

Patil_p

हिंडलगा जेलच्या कार्यक्षेत्रात होणार दोन तलावांची निर्मिती

Tousif Mujawar