Tarun Bharat

येळ्ळूर फलक खटल्यात दोघांची साक्ष

जि.पं.माजी सदस्य अर्जुन गोरल न्यायालयात उपस्थित

प्रतिनिधी / बेळगाव

येळ्ळूरच्या वेशीतील महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या जनतेला पोलिसांनी जबर मारहाण केली होती. त्यानंतर येळ्ळूरच्या जनतेवरच गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या खटल्याची सुनावणी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयात सुरू आहे. त्या ठिकाणी सोमवारी दोघांची साक्ष झाली आहे. यावेळी जिल्हा पंचायत माजी सदस्य अर्जुन गोरल उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक 27 जुलै 2014 रोजी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी येळ्ळूरच्या जनतेला मारहाण केली होती. त्यानंतर खोटे गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. यामधील 125/15, 126/15 या खटल्यांची सुनावणी सोमवारी होती. त्या ठिकाणी प्रकाश शंकर पन्यागोळ (रा. मार्कंडेयनगर), विनायक रामचंद्र ढवळी (रा. वडगाव) यांची साक्ष झाली आहे.

सोमवारी या खटल्याची सुनावणी होणार असल्याने म. ए. समितीच्या वकिलांनी तयारी केली होती. त्या ठिकाणी साक्षी झाल्या. यावेळी ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. शाम पाटील, ऍड. हेमराज बेंचण्णावर उपस्थित होते. या खटल्याची पुढील सुनावणी 22 मार्च 2021 रोजी होणार आहे.

शुक्रवारी आणखी दोन खटल्यांची सुनावणी शुक्रवार दि. 12 रोजी सीसी 166/15 व सीसी 167/15 या दोन खटल्यांची सुनावणी होणार आहे. या खटल्यांमध्ये समावेश असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वकिलांनी केले आहे.  

Related Stories

भाजप कार्यकर्त्यांनी केली मलप्रभेच्या घाटाची स्वच्छता

Amit Kulkarni

हुतात्मा दिन गांभीर्याने पाळणार

Patil_p

देसाई बिल्डिंगमधील बँडेड कपडे, शूज सेलला अभूतपूर्व प्रतिसाद

Amit Kulkarni

कोणत्याही प्रकारचे हल्ले डॉक्टर खपवून घेणार नाहीत

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह संख्या 141 वर

Tousif Mujawar

महापालिकेच्या योजना राबविण्यास होणार विलंब

Patil_p