Tarun Bharat

येळ्ळूर येथे दुर्गा दौडमुळे शिवमय वातावरण

Advertisements

तरुणांबरोबरच बालचमू अन् तरुणींनीही घेतला सहभाग : दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी /येळ्ळूर

दसरोत्सवाला प्रारंभ होताच दुर्गामाता दौडला सर्वत्र प्रारंभ होतो. येळ्ळूरमध्येही गेल्या आठ दिवसांपासून दुर्गामाता दौड उत्साहाने आणि शिवमय वातावरणात पार पडत आहे. या दौडमध्ये तरुणांसह बालचमू आणि तरुणीदेखील सहभागी होत आहेत. भगवे फेटे आणि भगवे ध्वज यामुळे सर्वत्र शिवमय वातावरण निर्माण होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणांनी येळ्ळूर परिसर दणाणून सोडला जात आहे. हिंदवी स्वराज्य युवक संघ व येळ्ळूर ग्रामस्थांच्यावतीने ही दौड काढण्यात येत आहे. प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन देवीचे दर्शन घेऊन त्याठिकाणी आरती म्हटली जात आहे. लहान मुलेदेखील दौडमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे या दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Related Stories

जिल्हाअंतर्गत परवानगीसाठी नागरिकांची मनपाकडे धाव

Patil_p

जिल्हय़ात 91 जि.पं.तर 299 ता.पं. मतदारसंघ

Omkar B

अनेक गुन्हय़ांचा छडा, पाणावल्या डोळय़ांच्या कडा

Patil_p

प्राचार्य डॉ. डी. जी. कुलकर्णी यांचा पुरस्काराने गौरव

Patil_p

केबल कट ; करमणूक थांबली

Patil_p

किरण करंबळकर यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!