Tarun Bharat

येळ्ळूर विभाग म. ए. समितीचा शुभम शेळके यांना पाठिंबा

उद्या गावातून प्रचार फेरी काढण्याचा निर्णय : मराठीसाठी झटणारे शुभम शेळके यांना विजयी करण्याचा बैठकीत निर्धार

प्रतिनिधी / येळ्ळूर

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांना येळ्ळूर विभाग म. ए. समितीने जाहीर पाठिंबा दिला असून रविवार दि. 11 रोजी गावातून भव्य प्रचारफेरी काढण्याचे ठरविण्यात आले आहे.

 येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून या बैठकीच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी होते.

युवकांमध्ये नवचैतन्य

येळ्ळूरने नेहमीच सीमाप्रश्नासाठी आपला त्याग दिला आहे. मराठी भाषिकांवर होणाऱया अन्यायाविरोधात लढा दिला आहे. लोकशाही मार्गाने अनेक लढे लढले आहेत. या पुढेही हे लढे लढण्याचा निर्धार येळ्ळूरवासियांनी केला आहे. मध्यवर्ती म. ए. समितीने शुभम शेळके यांना लोकसभेसाठी निवडणूक लढविण्यास हिरवा कंदील दाखविल्यामुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे. मराठीसाठी एकत्र झटणारे शुभम शेळके यांना विजयी करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

प्रारंभी सचिव प्रकाश अष्टेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या बैठकीमध्ये तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, उदय जाधव, उपाध्यक्ष राजू पावले, मनोहर घाडी, रामदास धुळजी, गजानन उघाडे, राकेश परीट, बाळकृष्ण पाटील यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.

या बैठकीला ग्रामपंचायत सदस्य रमेश मेणसे, महेश कानशीडे, दयानंद उघाडे, परशराम परीट, ग्रामपंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, सोनाली येळ्ळूरकर, मनीषा घाडी, शिवाजी पाटील, वामन पाटील, परशराम घाडी, विलास घाडी, प्रकाश पाटील, तुकाराम टक्केकर, यल्लाप्पा कुगजी, समीर परीट, अनंत पाटील, तानाजी पाटील, सूरज गोरल, शिवाजी कदम, श्रीकांत येळ्ळूरकर, मनोहर पाटील यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी यांनी आभार मानले.

Related Stories

भाजपच्या सत्ताकाळातच शिक्षकांच्या अनेक समस्या मार्गी

Amit Kulkarni

कारवार जिल्हय़ात कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू

Patil_p

आर. टी. लक्कनगौडर यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

Tousif Mujawar

सिद्धी महिला मंडळातर्फे दीपोत्सवाचे आयोजन

Omkar B

फॉगर मशीनद्वारे होणार क्वॉरंटाईन खोल्यांचे शुद्धीकरण

Patil_p

भरतेश एज्युकेशन ट्रस्ट देणार 75 रोबोंची सलामी

Amit Kulkarni