Tarun Bharat

येळ्ळूर संपूर्ण लॉकडाऊन; ग्रा.पं.कडून जनजागृती

प्रतिनिधी / बेळगाव

येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या माध्यमातून लॉकडाऊनबाबत जनजागृती करून जनतेला कोरोनापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळपासूनच पोलिसांच्या सहकार्यातून ही जनजागृती करण्यात आली. यावेळी विनाकारण फिरणाऱयांना पोलिसांनी प्रसादाचे वाटप सुरू केल्यामुळे अनेकांनी घरी राहणेच पसंत केले.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाबतची जनजागृती ग्राम पंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सोमवारपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार पोलीस प्रशासनाने येळ्ळूरच्या ग्राम पंचायतीला सूचना करून जनजागृतीचे आवाहन केले होते. त्यानुसार घंटागाडीच्या साहाय्याने सायरन वाजवत गावामध्ये जनजागृती करण्यात आली.

सकाळी 10 नंतर सर्व दुकाने बंद करण्यास भाग पाडण्यात आले. तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, ग्राम पंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, ग्राम पंचायत सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, महेश कानशिडे, दयानंद उघाडे, अरविंद पाटील, जोतिबा चौगुले, राकेश परीट, राजू डोण्याण्णावर, परशराम परीट, सुनील अरळीकट्टी, कल्लाप्पा मेलगे, पीडीओ अरुण नायक, सेपेटरी मराठे, माजी ग्राम पंचायत सदस्य सतीश कुगजी, ग्राम पंचायत कर्मचारी उदय हुंदरे, कलमेश कोकणे, महादेव मुरकुटे, शिवाजी हुवाण्णावर आदी उपस्थित होते.

Related Stories

चित्र प्रात्यक्षिकाला उदंड प्रतिसाद

Amit Kulkarni

भाजी झाली स्वस्त

Patil_p

केळकर बागेतील रस्ताकामासाठी रास्तारोको

Patil_p

शिक्षक बदली प्रक्रियेला स्थगिती

Amit Kulkarni

वृद्धांनी बजावला घरबसल्या मतदानाचा अधिकार

Omkar B

खडक गल्ली येथे नागरिकांना लसीकरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!