Tarun Bharat

येवले चहामध्ये भेसळ, FDAच्या अहवालातून उघड

ऑनलाईन टीम / पुणे : 

अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या ‘येवले चहा’ ला अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका बसला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालात या चहामध्ये भेसळ असल्याचे समोर आले आहे. या चहामध्ये रंग टाकत असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, येवले चहाची कोंढवा येथील शाखा बंदच ठेवण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाकडून देण्यात आले होते. हा चहा आरोग्यवर्धक असल्याचं सांगत तो तयार करण्यासाठी मिनरल वॉटर चा वापर करण्यात येतो असा दावा करणं त्यांना अडचणीत आणणारं ठरलं होतं.

कर्मचाऱयांची आरोग्य तपासणी, पँकबंद मालावर कोणती माहिती नसणे अशा विविध नियमांचे उल्लंघन आणि त्रुटीमुळे पुढील आदेश येईपर्यंत उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

 

 

Related Stories

आनंद आहे! पवारांना ब्राह्मणांची आठवण आली: देवेंद्र फडणवीस

Rahul Gadkar

सोलापूर : रुग्णवाहिकेवरील चालकांचा ‘कोरोना सुपर हिरोज’ म्हणून सन्मान

Archana Banage

सोलापूर : पंढरपुरात १७ ते २५ जुलैपर्यंत कडक संचारबंदी : जिल्हाधिकारी

Archana Banage

गृहराज्यमंत्र्यांच्या चमच्यांनी जास्त उडय़ा मारू नयेत : धनंजय महाडिक

Archana Banage

शेतकऱयांच्याही नाईट लाईफचा विचार करा : देवेंद्र फडणवीस

prashant_c

सोलापूर : महसूल कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी काळ्या फिती लावून आंदोलन

Archana Banage