Tarun Bharat

येस बँकप्रकरणी अंबानींना समन्स

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कर्जांच्या थकबाकीमुळे संकटात सापडलेल्या येस बँकेचे कामकाज बुधवारपासून पूर्ववत सुरू होणार आहे. मात्र सरकारने या बँकेची कर्जे थकविलेल्या अनेक बडय़ा उद्योगपतींविरोधात कठोर कारवाईचे शस्त्र उगारले आहे. प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना याप्रकरणी अंमलबजावाणी संचालयालयाने नोटीस पाठविली आहे. उद्योगपती सुभाषचंद्रा यांनाही नोटीस पाठविण्यात आली आहे. अनिल अंबानींची मनी लाँडरिंगप्रकरणीही चौकशी केली जाणार आहे. येस बँकेची थकबाकी साधारणतः दोन लाख कोटींपर्यंत असल्याचे सांगितले जाते. या बँकेने अनिल अंबानींना मोठय़ा प्रमाणात कर्जपुरवठा केल्याची बाब समोर आली आहे.

Related Stories

आता होणार ४ वर्षांसाठी सैन्य भरती

Abhijeet Khandekar

संसदेवरील हल्ल्याला 20 वर्षे पूर्ण

Patil_p

जम्मूच्या किश्तवाडमध्ये दुर्घटनेत 8 ठार

Patil_p

शिशीर सौंदर्य…

Patil_p

तिस्ता सेटलवाड यांना जामीन मंजूर

Patil_p

हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांना खलिस्तानी दहशतवाद्याची धमकी

Patil_p