Tarun Bharat

‘यॉर्कर’ने अठराविश्वे दारिद्रय़ाची शकले पाडणारा टी. नटराजन

Advertisements

जे कष्टातून घडतात, ते आपण केलेला संघर्ष सहसा विसरत नाहीत आणि सनरायजर्स हैदराबाद संघाचा आघाडीचा युवा गोलंदाज टी. नटराजन हा त्यांच्यापैकीच एक. आपल्या ‘पिनपॉईंट’ यॉर्कर्सच्या बळावर घरच्या अठराविश्वे दारिद्रय़ाची शकले त्याने पाडली आहेत. कुटुंबासाठी त्याने सर्व काही केले. पण, आपल्या आईचे रस्त्याशेजारी थांबून चिकनविक्री करणे मात्र त्याला थांबवता आलेले नाही.

यंदाच्या आयपीएल स्पर्धेपूर्वी काही प्रथमश्रेणी स्पर्धांच्या माध्यमातून नटराजन ‘डेथ बॉलिंग स्पेशालिस्ट’ म्हणून नावारुपास आला आणि त्यानंतर त्याने सातत्याने एकापेक्षा एक अव्वल फलंदाजांना आपल्या यॉर्करच्या ब्रम्हास्त्रावर अक्षरशः नामोहरम केले आहे.

क्रिकेटमधील कारकीर्द गाजवत असताना त्याने कुटुंबासाठी घर उभे केले, बहिणींच्या शिक्षणासाठी मदत केली. शिवाय, तामिळनाडूतील सालेम जिल्हय़ात चिन्नाप्पम्पट्टी या खेडय़ात अकादमीही सुरु केली. ज्यांनी क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्याचा वसा उचलला, त्यांनी या ध्येयापासून मागे हटू नये, असे त्याला वाटते.

टी. नटराजनला 2017 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबने 3 कोटी रुपयांना करारबद्ध केले. या कराराला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना हा युवा गोलंदाज खऱया अर्थाने चर्चेच्या प्रकाशझोतात आला आहे. यापूर्वी खेळलेल्या 6 सामन्यात तो महागडा ठरला होता. मात्र, यंदा त्याच्याकडून संघाला बऱयाच अपेक्षा आहेत. 2018 मध्ये टी. नटराजनला सनरायजर्स हैदराबाद संघाने स्थान दिले. पण, यंदा प्रथमच त्याला अंतिम संघातून संधी मिळाली.

मंगळवारी सनरायजर्सने दिल्ली हैदराबादला नमवले, त्यावेळी नटराजनने डावातील 14 व्या व 18 व्या षटकात यॉर्कर्सचा सिलसिलाच सुरु करत त्याने मोलाचा वाटा उचलला. त्याचे सामन्यातील पृथक्करण 4 षटकात 21 धावात 1 बळी असे राहिले. त्याला ऑस्ट्रेलियन बिगहिटर मार्कस स्टोईनिसची प्राईज विकेट मिळाली. रोजंदारीवरच घर चालवणाऱया आपल्या पालकांना टी. नटराजनने यशाची पहाट दाखवली. आता हाच धडाका तो यंदाच्या आयपीएल स्पर्धेत कायम राखेल, अशी अपेक्षा सनरायजर्सची असणार आहे.

थोडक्यात टी. नटराजन

पूर्ण नाव : थंगरसू नटराजन

जन्म : 27 मे 1991 (सालेम, तामिळनाडू)

गोलंदाजी शैली : डावखुरा जलद मध्यमगती

सध्याचे संघ : सनरायजर्स, तामिळनाडू, लिका कोव्हिल किंग्स

आयपीएलमधील प्रदर्शन : 9 सामन्यात 5 बळी

आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी : 1-25

Related Stories

फिफा वर्ल्डकपसाठी अर्जेंटिना संघ जाहीर

Patil_p

भारत-सर्बिया महिला फुटबॉल सामना आज

Patil_p

महिला क्रिकेटपटू अन्शुला राववर डोपिंगमुळे चार वर्षांची बंदी

Patil_p

बुमराहने कौंटीऐवजी विश्रांतीला प्राधान्य द्यावे : अक्रम

Patil_p

भारतीय हॉकी संघाला कोरोना लसीचा पहिला डोस

Patil_p

युपी योद्धाज-गुजरात आज लढत

Patil_p
error: Content is protected !!