Tarun Bharat

‘योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा’

Advertisements

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली

योगगुरु बाबा रामदेव यांचा कोरोनावरील उपचारासंदर्भात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, एलोपॅथी उपचारपद्धतीबद्दल त्यांनी अविश्वासर्हता दर्शवली आहे. कोरोनावरील उपचार पद्धतीत फॅबीफ्लू आणि स्टेरॉईडसह अन्य अँटीबॉयोटीक्सही फेल ठरल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे न होता, एलोपॅथिक औषधांमुळेच झाल्याचा दावाही त्यांनी केलाय.

इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांनी केलेल्या या दाव्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणीही संघटनेच्यावतीने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. इंडियन मेडीकल असोसिएशनने याबाबत एक परिपत्रक जारी करुन ही मागणी केली आहे.

Related Stories

ब्राझीलमध्ये 24 तासात 55 हजार नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

‘या’ राज्यातील निवडणुकीत काँग्रेसला वाटतोय क्रॉस व्होटिंग चा धोका

Kalyani Amanagi

ना‘पाक’ मनसुबे उधळले; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Amit Kulkarni

दोन महिलांची कंपनी, 100 कोटींची उलाढाल

Patil_p

पेट्रोल-डिझेल दर वाढता वाढता वाढे

Patil_p

रीवा सौरऊर्जा प्रकल्प देशाला समर्पित

Patil_p
error: Content is protected !!