Tarun Bharat

योगग्राम सांबरवाडीत घराघरात योगा

प्रतिनिधी / सातारा

सातारा शहरसह जिह्यात आंतरराष्ट्रीय योगादिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनामुळे गर्दी करायची नाही. हा नियम असल्याने झूम ऍपवरुन संवाद साधत योगा करण्यात आला. योगग्राम म्हणून ओळखल्या जाणार्‍या सांबरवाडीत घरोघरी योगा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्ताने जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद शिक्षण विभाग व आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन योगाचे आयोजन करण्यात आले होते. शाहु क्रिडा संकुलात मोजकेच योगाशिक्षक जमले होते. त्यांनी झूम ऍपवरुन मार्गदर्शन केले. यास जिल्हा रुग्णालय सातारा, इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनाझेशन, आर्ट ऑफ लिव्हींग, पतजंली योग, हॅपी लाईफ फौंडेशन, गाथा योग साधना केंद्र, योग विद्याधाम सातारा, गुरुकृपा राजयोग चॅरिटेबल ट्रस्ट, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नगरस्थान सातारा, सातारा जिल्हा शारिरीक शिक्षण शिक्षक संघ सातारा यांनी सहकार्य केले. अनेकांनी या ऑनलाईन योगा दिनात सहभाग घेतला होता.

सातारा येथील योगग्राम असलेले सांबवाडी या गावात घरोघरी योगा करण्यात आला. महिलांनीही सहभाग घेतला होता. योगशिक्षक प्रल्हाद पार्टे यांनी मार्गदर्शन केले. योगाचे महत्व पटवून सांगताना ते म्हणाले, योगामुळे सकारात्मक उर्जा मिळते. चांगले विचार मिळतात. शरीर तंदुरुस्त रहाते, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

शहरातील सर्व दुकाने आजपासून सम-विषम तारखांना उघडणार

Archana Banage

आता हुशार मुलं निवडली जाणार

Patil_p

अमरावती लव्ह जिहाद प्रकरणातील युवती अखेर सापडली

datta jadhav

महिला बचतगटांना प्रकल्प संचालकांची सक्त ताकीद

Patil_p

पोलीस, होमगार्डला मारहाण केल्याप्रकरणी चौघे ताब्यात

Patil_p

सातारा जिल्ह्यात पुन्हा टाळेबंदी

Archana Banage