Tarun Bharat

योगी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

  • रामजन्मभूमीकडे जाणाऱया रस्त्याचे ‘कल्याण सिंह मार्ग’ असे नामकरण

ऑनलाईन टीम / लखनऊ :

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्यावर आज सायंकाळी नरोरा येथे गंगा नदीच्या किनाऱयावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यापूर्वी योगी सरकारने त्यांना सन्मानित करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले की, अयोध्यामध्ये राम जन्मभूमी परिसराकडे जाणाऱया रस्त्याला कल्याण सिंह मार्ग असे नाव दिले जाणार आहे.

केशव मौर्य यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, अयोध्येत रामजन्मभूमीकडे जाणाऱया रस्त्याचे नाव कल्याण सिंह मार्ग असे ठेवले जाणार आहे. यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे पूर्ण करण्याची जबाबदारी पीडब्ल्यूडीला देण्यात आली आहे. अयोध्येसह लखनऊ, अलीगड, एटा, बुलंदशहर आणि प्रयागराजमधील प्रत्येकी एका रस्त्याला कल्याण सिंह यांचे नाव दिले जाणार आहे.

पुढे ते म्हणाले, अलीगड एयरपोर्टला देखील कल्याण सिंह यांचे नाव देण्याचा विचार सुरू आहे. लवकरच यावर निर्णय घेतला जाईल. अलीगड येथील अतरौली हे कल्याण सिंह यांचे जन्म गाव आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे शनिवारी निधन झाले. वयाच्या 89 व्या वषी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कल्याण सिंह हे चार जुलैपासून लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल होते. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा पाळला जाणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट घेतली. कल्याण सिंह हे राजस्थानचे राज्यपाल देखील होते. याशिवाय, ते भाजपचे संस्थापक नेते होते. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून अनेक ज्येष्ठ नेते त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले होते. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचा समावेश आहे.

Related Stories

विक्रमी वेळेत 1 किमी लांबीच्या बोगद्याची निर्मिती

Patil_p

मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा वादात?; नामांतरावरुन ‘त्या’ उद्यानाचं उद्घाटन रद्द

datta jadhav

भाजपच्या माजी आमदाराचा आत्महत्येचा प्रयत्न

Abhijeet Khandekar

मतदार यादीसंबंधी केंद्राला नोटीस

Patil_p

अरविंद केजरीवाल घेणार शरद पवार आणि उध्दव ठाकरेंची भेट

Archana Banage

योगी आदित्यनाथ यांना करावा लागला तरुणांच्या रोषाचा सामना

Archana Banage
error: Content is protected !!