Tarun Bharat

योगी सरकारमधील ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण

ऑनलाईन टीम / लखनऊ : 


उत्तर प्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यातच आता योगी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. प्रदेशातील नागरिक उड्डयन मंत्री नंद गोपल गुप्ता नंदी यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली. 


नंदी हे प्रदेश सरकारमधील 17 वे मंत्री आहेत, ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर या व्यतिरिक्त दोन मंत्री चेतन चौहान आणि कमला राणी वरुण याचे कोरोनामुळे निधन झाले आहे. 

नंदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, मला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरामध्येच क्वारंटाइन झालो आहे. पुढे ते म्हणाले, 2010 मध्ये झालेल्या आरडीएक्स हल्ल्यानंतर झालेल्या अनेक शस्त्रक्रियांमुळे माझ्या तब्येतीची गुंतागुंत वाढली आहे. मात्र, दक्षता, व्यवस्थित काळजी, संतुलित आहार आणि न घाबरणे हे कोरोना विरोधात लढण्याचे प्रभावी मार्ग आहेत. प्रदेश सरकारचे स्नेह आणि तुम्हां सर्वांच्या सदिच्छांमुळे मी लवकरच बरा होईन आणि पुन्हा कामाला लागेन, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


दरम्यान, यापूर्वी योगी सरकारमधील कारागार मंत्री जय कुमार सिंह जैकी, आरोग्यमंत्री जय प्रकाश सिंह, जल शक्ती मंत्री महेंद्र सिंह, ग्राम विकास मंत्री राजेंद्र प्रताप सिंह उर्फ मोती सिंह, न्याय मंत्री ब्रजेश पाठक, आयुष राज्यमंत्री धर्म सिंह सैनी, खेळ आणि युवा कल्याण राज्यमंत्री उपेंद्र तिवारी, एमएसएमई राज्यमंत्री चौधरी उदयभान सिंह, आरोग्य राज्य मंत्री अतुल गर्ग, पंचायती राज मंत्री भूपेंद्र सिंह चौधरी, एमएसएमई मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह, वक्फ मंत्री मोहसिन रजा, बलदेव सिंह औलख, औद्योगिक विकास मंत्री सतीश महान आदींना कोरोनाची लागण झाली आहे. 

Related Stories

सेमीकंटक्टर, डिस्प्ले उत्पादनासाठी मोठय़ा सवलती देणार

Patil_p

दिल्लीत गेल्या 24 तासात 340 नवे कोरोना रुग्ण; 04 मृत्यू

Tousif Mujawar

उत्तराखंडमधील परिस्थितीचा पंतप्रधान मोदी, शाह यांच्याकडून आढावा

datta jadhav

उत्तराखंडमध्ये ढगफुटी

Patil_p

छत्तीसगडमध्ये गरोदर महिलांसाठी पहिले विलागिकरण केंद्र सुरू

Tousif Mujawar

लॉकडाऊनमध्ये जनतेला ‘शॉक’

Patil_p