Tarun Bharat

योग दिन विशेष…

2015 पासून दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस (International Yoga Day) म्हणून साजरा केला जातो. यंदा या योगा डे सेलिब्रेशनचं 8वं वर्ष आहे. या वर्षी जागतिक योगा डे “Yoga For Humanity” या थीमवर साजरा केला जाणार आहे. अनेक आजारांवर मात करण्यासाठी शरीराची, मनाची तयारी करण्यासाठी, अनेक व्याधींना शरीरापासून दूर ठेवण्याकरिता रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग साधना मदत करते.
योगा अभ्यास नियमित करण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे हा केवळ एक दिवस सेलिब्रेशनचा भाग नाही. धकाधकीच्या जीवनात निरामय आरोग्यासाठी, समाधानी आयुष्यासाठी स्वतःची मानसिक आणि शारिरीक तयारी ठेवण्यासाठी तुम्हांला योगाभ्यास नक्कीच मदत करू शकते.

योगाभ्यास करायचा असेल तर काही नियम पाळावे लागतात. तसेच योगाभ्यास करताना श्वास घेणे आणि सोडणे ही गोष्टही महत्वाची आहे. त्यामुळे योगाभ्यास करण्याआधी काही महत्त्वाचे नियम जाणून घेणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे योगाभ्यास करताना कधीही जबरदस्तीने करू नये. योगाभ्यास जेवढ्या आरामात कराल, तेवढा तुम्हाला फायदा होईल. पण तरी सुद्धा काही लोक योगाभ्यास करताना चुका करतातच

योगाचे फायदे

योगाभ्यास करण्याची कला एखाद्या व्यक्तीचे मन, शरीर आणि आत्मा नियंत्रित करण्यास मदत करते. हे शांतीपूर्ण शरीर आणि मन साध्य करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक शिस्त एकत्र आणते; हे तणाव आणि चिंता व्यवस्थापित करण्यात मदत करते आणि आपल्याला आराम देते. हे लवचिकता, स्नायूंची ताकद आणि शरीराची टोन वाढविण्यात देखील मदत करते.

दररोज नियमित किमान तासभर योगा, प्राणायाम व आसने केल्याने मन प्रसन्न राहून दैनंदिन कामे करताना नवी ऊर्जा मिळते. शरीर सुदृढ राहून विविध आजार व व्याधींपासून मुक्ती मिळते. त्यामुळे लहानांसह, तरुण व ज्येष्ठांनी निरंतर योगा करावा



Related Stories

सेन्सेक्सची झेप नव्या विक्रमावर 1181 अंकांची उसळी

Patil_p

हलशी आरोग्य केंद्रात कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती

Tousif Mujawar

सोलापूर शहरात 24 कोरोना पॉझिटिव्ह, एका रुग्णाचा मृत्यू

Archana Banage

ग्रामीण भागातील २० लाख कुटुंब व १ कोटी जनते पर्यंत संगणकपरिचालक पोहचवणार आरोग्य सेतु अँप

Archana Banage

शिराळ्यात अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व दुकाने बंद

Archana Banage

…तर श्रीलंकेहून वाईट स्थिती होईल

Archana Banage