Tarun Bharat

रँकींगसाठी केवळ सीईटीचेच गुण विचारात

Advertisements

शिक्षणमंत्र्यांचा सल्ला – उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांची माहिती

प्रतिनिधी\ बेंगळूर

यंदा बारावीची परीक्षा रद्द झाली असली तरी पुढील व्यावसायिक शिक्षणासाठी सीईटी घेण्यात येईल. सीईटी किंवा नीटमध्ये मिळालेले गुणच रँकींगसाठी विचारात घेण्याचा सल्ला प्राथमिक-माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिला आहे. त्यामुळे याबाबत लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा उच्च शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली आहे.

इंजिनियरिंग आणि मेडिकल कोर्सच्या प्रवेशासाठी बारावी परीक्षेत मिळालेल्या गुणांचाही विचार केला जात होता. मात्र, यंदा कोरोना परिस्थितीमुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तरी सुद्धा संसर्ग कमी झाल्यानंतर सीईटी घेण्यात येईल. या परीक्षेत मिळालेले गुणच रँकींगसाठी गृहीत धरले जातील. यंदा बारावीत मिळालेल्या गुणांचा विचार रँकींगसाठी केला जाणार नाही. याबाबत अधिकारी आणि उच्च शिक्षण विभागातील तज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

शिवाय हा बदल करायचा असेल तर कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे. कायदे तज्ञ आणि मुख्यमंत्र्यांशीही याविषयी चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बारावी निकालासाठी दहावीतील गुणही विचारात घेणार

यंदा बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना दहावीत मिळालेल्या गुणांचाही आधार घेऊन निकालपत्रक तयार करण्याची सूचना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी अधिकाऱयांना दिली आहे. बारावी विद्यार्थ्यांचा निकाल परिपूर्ण आणि न्याययुक्त बनविण्यासाठी त्यांना दहावीत मिळालेल्या गुणांचाही विचार व्हावा. यासंबंधी कर्नाटक माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांच्या दहावीतील गुणांची माहिती मिळवून तसेच अकरावीत मिळालेल्या गुणांशी एकरुप करून निकाल जून अखेरपर्यंत जाहीर करावा, अशी सूचनाही सुरेशकुमार यांनी शिक्षण खात्यातील अधिकाऱयांना दिली आहे.

Related Stories

नितीश कुमार सरकारमधील कॅबिनेट मंत्री विनोद कुमार सिंह यांचे निधन

Tousif Mujawar

ठेवीदारांना सुरक्षा

Patil_p

माजी राष्ट्रपती प्रणवदा अनंतात विलीन

Patil_p

उत्तरप्रदेशात शिरले 2 दहशतवादी

Patil_p

कर्नाटक : युकेहून आलेल्या ११९ जणांचा अद्याप शोध नाही

Archana Banage

पेट्रोलनंतर आता डिझेलही ‘शंभरी’कडे

Patil_p
error: Content is protected !!