Tarun Bharat

रक्तदान करून हुतात्म्यांना अभिवादन

शहापूर विभाग समितीचा अनोखा उपक्रम

प्रतिनिधी / बेळगाव

महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभागाच्यावतीने हुतात्मा दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गोवावेस येथील रामलिंगवाडी सिद्धिविनायक मंदिर येथे अनोख्या पद्धतीने हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. यामध्ये 60 हून अधिक मराठी भाषिकांनी रक्तदान करून हुतात्म्यांना अभिवादन केले.

हुतात्म्यांनी केलेल्या बलिदानामुळेच मागील 65 वर्षे सीमाप्रश्न ज्वलंत आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण येणाऱया पिढीला व्हावी व त्यातून समाजालाही हा प्रश्न समजावा या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला मराठी भाषिकांनी मोठा प्रतिसाद दिला. बेळगाव ब्लड बँकेच्या डॉक्टरांनी रक्त संकलन केले.

यावेळी राजकुमार बोकडे, सुनील बोकडे, राजू वर्पे, किरण गवळी, सूरज गवळी, रजत बोकडे, कपिल बिर्जे, विशाल बिर्जे, दीपक तुळसकर, रविंद पवार, अनिकेत जांगळे, चंद्रकांत पाटील, उमेश भातकांडे, सदानंद बिर्जे, किशोर गवळी, प्रवीण शिवणगेकर, श्रीशैल पाटील, अभिषेक हवालदार, निखिल शहापूरकर, शिवाजी हावळ्ळाण्णाचे, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, श्रीकांत कदम, किरण गावडे, रणजित हावळ्ळाण्णाचे, रवी पवार, मदन बामणे, किरण परब, सुधीर नेसरीकर, राजू गावडोजी, गजानन शहापूरकर यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

सेवानिवृत्त अभियंत्यांतर्फे अभियंता दिन साजरा

Patil_p

अन हा “रियल बाहुबली”..!

Rohit Salunke

वडापचालक प्रवाशांच्या प्रतीक्षेत …

Patil_p

युनियन जिमखाना, अमृत पोतदार सीसीआय संघ विजयी

Amit Kulkarni

वाहतूक दक्षिण पोलीस स्थानकाचा कारभार संशयाच्या भोवऱयात

Patil_p

निपाणीत सुलभ भगवत गीता प्रकाशन सोहळा

Patil_p