Tarun Bharat

रक्षक कॉलनी जिजाऊ महिला मंडळातर्फे हिंडलगा महालक्ष्मीसाठी चांदीचे मुकुट सुपूर्द

वार्ताहर / हिंडलगा

रक्षक कॉलनी, विजयनगर, हिंडलगा येथील जिजाऊ महिला मंडळातर्फे हिंडलगा येथे नियोजित श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री महालक्ष्मीदेवीसाठी 570 ग्रॅम चांदीचे मुकुट मंगळवार दि. 9 रोजी यात्रोत्सव संघाच्या पदाधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आले.

यानिमित्त श्ा़खाr महालक्ष्मी देवीच्या मूर्तीसाठी बनविण्यात आलेल्या चांदीच्या मुकुटासह रक्षक कॉलनी, विजयनगर परिसरातून हिंडलग्यापर्यंत भंडाऱयाची उधळण करत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यादरम्यान भाविकांनी ठिकठिकाणी औक्षण करून मिरवणुकीचे स्वागत केले. त्यानंतर हिंडलगा लक्ष्मी गल्लीतील श्री लक्ष्मी मंदिरासमोर मिरवणुकीची सांगता करण्यात आली. रक्षक कॉलनी, विजयनगर परिसरातील महिला व नागरिकांच्या वर्गणीतून देवीसाठी बनविलेल्या 570 ग्रॅम चांदीचे मुकुट श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघाच्या पदाधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी यात्रोत्सव संघाचे अध्यक्ष कृष्णा पावशे, कार्याध्यक्ष रमाकांत पावशे, यल्लाप्पा काकतकर, मोहन नाईक, मल्लाप्पा देवगेकर, उदय नाईक, चंद्रकांत अगसगेकर, महादेव बेळगुंदकर, गजू जगताप, परशराम कुडचीकर, मुकुंद कंग्राळकर, प्रभाकर काकतकर, बाळू सांगावकर, मधू कोकितकर, तुकाराम फडके, मुकुंद हदगल यांच्यासह जिजाऊ महिला मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

बेंगळूर : कोविड केअर सेंटरमधील सुमारे ६४ टक्के बेड रिक्त

Archana Banage

वन्यप्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी भुयारी मार्ग करा

Amit Kulkarni

बेळगाव-कोल्लम रेल्वेचा शुभारंभ

Amit Kulkarni

देसूर येथे वीट व्यवसायाला लवकरच प्रारंभ

Amit Kulkarni

एपीएमसी केंद्राचा अभाव, रस्त्यावरच शेतमालाची विक्री

Omkar B

संक्रांतीसाठी बाजारपेठ बहरली

Patil_p