Tarun Bharat

रखवालदार महिलेच्या खुनाने बेळगाव हादरले

बेळगाव / प्रतिनिधी

सिव्हिल हॉस्पिटलमधील रखवालदार (सेक्मयुरिटी गार्ड) महिलेचा तलवारीने हल्ला करून भीषण खून करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी 7.45 वाजन्याच्या सुमारात गणेश मंदिराच्या पाठीमागे खुनाचा हा प्रकार घडला आहे. प्रेम प्रकरणातून  ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलीसांनी आरोपिला ताब्यात घेतले आहे.

सुधारानी बसवराज हडपद (वय 29 मूळची रा. मुगबसव ता. बैलहोंगल) सध्या रा. कंग्राळी खुर्द असे खुन झालेल्या रखवालदार महिलेचे नाव आहे. या प्रकरणी इराण्णा जगजंपी वय 22 रा. बैलहोंगल या तरूणाला ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस उपआयुक्त चंद्रशेखर निलगार, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी आदी अधिकारी घटनस्थळी दाखल झाले.

नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी मुगबसव येथील सुधारानीच्या कुटुंबियानी तीला फोन केला. प्रतिसाद मिळाला नाही तोपर्यंत पोलीसांनी कुटुंबीयांशी संपर्क साधून खुन झाल्याची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीय बेळगावात दाखल झाले.  एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. खुनासाठी वापरलेली धारदार तलवार पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. या घटनेने सिव्हिल हॉस्पिटल परिसर हादरून गेला आहे.

Related Stories

माळमारुती, एक्स्ट्रीम संघ विजयी

Amit Kulkarni

पाणीपुरवठा कारभार हस्तांतराबाबत आज चर्चा शक्य

Amit Kulkarni

चक्रीवादळामुळे तालुक्यात पावसाची संततधार : बळीराजा चिंतेत

Amit Kulkarni

बसुर्ते फाटा-महाराष्ट्र हद्दीपर्यंत रस्त्याची दुर्दशा

Amit Kulkarni

गणेशोत्सवासाठी बाजारपेठ बहरतेय

Amit Kulkarni

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कर्नाटक-आंध्र प्रदेशात पाण्याचे वाटप होणार : मंत्री सुधाकर

Archana Banage