ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सुपरस्टार रजनीकांत यांनी यांनी राजकारणात येणार नसल्याचे जाहीर करत अखेर राजकारणाला रामराम ठोकला आहे. रजनीकांत यांनी रजनी मक्कल मंदरम संघटना बरखास्त करत राजकारणच्या दिशेने सुरु केलेला प्रवास थांबवला आहे. संघटनेच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर रजनीकांत यांनी निर्णय जाहीर केला आहे. भविष्यात राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही, असे देखील रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे.


रजनीकांत यांनी राजकारणात येणार नसल्याची घोषणा करताना रजनी मक्कल मंदरम संघटना बरखास्त करुन ‘रजनीकांत रसीगर नारपानी मंद्रम’ किंवा ‘रजनीकांत फॅन्स वेलफेअर फोरम’ म्हणून काम करेल, असे देखील जाहीर केले आहे.


दरम्यान, 29 डिसेंबर 2020 रोजी रजनीकांत यांनी जाहीर केले होते की आपण राजकारणात प्रवेश करणार नाही. पण अलीकडेच त्यांनी राजकारणात येण्याबाबत पुन्हा चर्चा करणार असल्याचे म्हटले होते. पण आता त्यांनी अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. रजनीकांत यांच्या राजकारणात परत येण्याच्या चर्चेवरुन तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ उडाली होती.