Tarun Bharat

‘रडने का नही, भिडने का’; चित्रा वाघ यांनी घेतली तहसीलदार ज्योती देवरेंची भेट

अहमदनगर/प्रतिनिधी

पारनेरच्या महिला तहसीलदार ज्योती देवरे यांनी आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत सुसाईड ऑडिओ क्लिप जारी केली होती. यांनतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर हल्लाबोल केला होता. चित्रा वाघ यांनी लंके यांना ‘सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मरणाऱ्यांकडून होतयं का तेचं आता पहायचयं’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला होता. आता चित्रा वाघ यांनी पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांना ‘रडने का नही, भिडने का’ म्हणत पाठिंबा दिला. तसेच आम्ही सर्व तहसीलदार देवरे यांच्यासोबत असल्याचंही जाहीर केलं. यामुळे वाघ यांनी लंकेंविरोधात दंड थोपटल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, ज्योती देवरे यांनी तिथल्या लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा इशारा दिलाय. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या दिपाली चव्हाण यांना उद्देशून त्यांनी एक पत्र लिहिलं आहे आणि त्यांनी म्हटलंय की मी ही तुझ्याकडे लवकरच येतेय. त्यात त्यांनी प्रशासनाकडून कसा छळ होतो, लोकप्रतिनिधी कसे त्रास देतात, वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचं दाहक वास्तव त्यांनी उभं केलंय. मध्येच त्या हमसून हमसून रडतानाही दिसत आहेत आणि हिच माझी सुसाईड नोट समजा असंही त्यांनी त्या पत्रात म्हटलंय. खरं तर सुसाईड नोटमध्ये सगळ्यांची नावं लिहून ठेवायची आणि कोर्टात ती खोटी ठरली तर? हिरा बनसोडेसारखं फिर्याद कुणाकडे मागायची? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.

Related Stories

सर्वोच्च न्यायालयातील १० न्यायाधीश, ३० टक्के कर्मचारी पॉझिटिव्ह

Archana Banage

सीमाप्रश्न अचानक वरती कसा आला?

Abhijeet Khandekar

शेंद्रनजिक ट्रक अपघातात दोन ठार

Patil_p

राज्यपालांच्या ‘या’ अटींनी ‘मविआ’च्या पळवाटा झाल्या बंद

Archana Banage

तुमची मस्ती एका दिवसात उतरेल : खा. उदयनराजे

datta jadhav

केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात, देशात सर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला

Archana Banage